७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकरच मिळणार!
| लेखा व वित्त विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे मागितली माहिती
पुणे | पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हत्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. याबाबत लेखा व वित्त विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे कर्मचारी संख्या आणि लागणारी रक्कम याची माहिती मागितली आहे. मात्र दुसरीकडे असा देखील सवाल केला जात आहे कि ही माहिती जर लेखा विभागाकडे उपलब्ध असताना आयटी विभागाकडून माहिती घेऊन वेळ का दवडला जात आहे.
महापालिका कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार वेतन देखील होत आहे. मात्र हा आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला आहे. त्यामुळे तो फरक कर्मचाऱ्यांना समान ५ हफ्यात दिला जाणार आहे. २०२१ सालातील १० महिन्याचा फरक या आधी देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच
समान हम्याची रक्कम दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर माहे जुलै मध्ये रोखीने अदा करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचेमार्फत मा. महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदन सादर केले असता अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “एकूण कर्मचारी संख्या व आवश्यक निधी बाबत विचारणा केलेली आहे. ही विचारणा लेखा व वित्त विभागाने केली होती. त्यानुसार आता लेखा व वित्त विभागाने यासाठी आयटी विभागाला कामाला लावले आहे. लेखा विभागाने कर्मचारी संख्या व सेवानिवृत्त सेवक अशी एकूण संख्या तसेच पहिल्या हफ्त्यासाठी देय रक्कमेचा तपशिल पाठवण्याबाबत पत्र आयटी विभागाला दिले आहे.
असे असताना दुसरीकडे असा देखील सवाल केला जात आहे कि ही माहिती जर लेखा विभागाकडे उपलब्ध असताना आयटी विभागाकडून माहिती घेऊन वेळ का दवडला जात आहे.