7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा 

HomeBreaking Newsपुणे

7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा 

Ganesh Kumar Mule May 02, 2023 12:27 PM

7th Pay Commission : PMC : बोनस मिळाला; आता वाढीव वेतन कधी?  महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला सवाल
7th Pay Commission Update News | महागाई भत्ता (DA) सोबत, घरभाडे भत्ता (HRA) मध्ये मोठी वाढ होणार!
Retired employees of PMC | महापालिकेच्या सेवानिवृत्त सेवकांना फरकाची रक्कम मिळण्यास सुरुवात

7th Pay Commission Latest news | वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा

7th Pay Commission Latest news |  महापालिका कर्मचारी (PMC Pune Employees and officers) आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. दुसरा हफ्ता बाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त (Audit and finance Department) विभागाकडून जारी करण्यात आले होते. याबाबत ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त दिले होते.  त्यानुसार मागील आठवड्यात शुक्रवारी संध्याकाळी वेतन आयोगाच्या दुसऱ्या हफ्त्याची रक्कम पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना अ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस  मान्यता प्राप्त झालेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सेवकवर्ग व सातव्या वेतन आयोगाचा दुसऱ्या हप्त्याच्या खर्चासाठी अपुरी पडणारी रक्कम सन २०२२-२३ अर्थसंकल्पातील
अखर्चित रक्कमेमधून वर्गीकरणाने उपलब्ध करून देणेस  आयुक्त तथा प्रशासक यांची मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यानुसार दुसरा हफ्ता बाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त विभागाकडून जारी करण्यात आले होते. रक्कम जमा झाल्याने कर्मचारी वर्गात आनंदाची लहर आहे. (PMC Pune News)