71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न   : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर   : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न

HomeपुणेPMC

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न : प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर : एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न

Ganesh Kumar Mule Sep 03, 2021 6:50 AM

Complain to Pune Municipal Corporation if tanker drivers ask for money
Road Repair work | पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली जाणार  | 140 ठिकाणाची केली जाणार डागडुजी 
Pune Water Supply Charges | पुणे महापालिकेकडे जलसंपदा विभागाची कुठलीही थकबाकी नाही! | पुणे महापालिकेने राज्य सरकारला सादर केला आपला अभिप्राय

71 नगरसेवकांनी मुख्य सभेत गेल्या 4 वर्षात उपस्थित केला नाही एक ही प्रश्न

: प्रश्न विचारण्यात काँग्रेस आघाडीवर

: एकट्या आबा बागुल यांनी विचारले 109 प्रश्न

पुणे: महापालिकेची निवडणूक समीप येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कसून तयारी चालवली आहे. सर्वच पक्षांनी पंचवार्षिक मध्ये काय कामे केली, याचा लेखाजोखा परिवर्तन संस्थेने मांडला आहे. संस्थेच्या अहवालानुसार गेल्या 4 वर्षात 162 पैकी सुमारे 71 नगरसेवकांनी मुख्य सभेत एक ही प्रश्न विचारला नाही. तर प्रश्न विचारण्यात कांग्रेस आघाडीवर राहिली. त्यात ही कांग्रेस चे गटनेता आबा बागुल यांनी 109 प्रश्न विचारले आहेत.

 : ड्रेनेज व पावसाळी गटारे च्या कामाला प्राधान्य

संस्थेच्या अहवालानुसार नगरसेवकांनी 4 वर्षात 90 कोटी 90 लाखाचा निधी विविध कामांसाठी वापरला आहे. त्यात हि सगळ्यात जास्त निधी ड्रेनेज व पावसाळी गटारे च्या कामाला वापरण्यात आला आहे. जवळपास 15 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. त्यानंतर कापडी पिशव्यांसाठी 11 कोटी खर्च करण्यात आले आहेत. मागील पंचवार्षिक मध्ये देखील अशीच स्थिती होती. याच दोन कामांना नगरसेवकांकडून प्राधान्य दिले गेले होते.

: नगरसेविका गायत्री खडकेंचा उपस्थित राहण्यात पहिला नंबर!

परिवर्तन संस्थेने यासोबतच नगरसेवकांचे मुख्य सभेत उपस्थित राहण्याबाबत ही अहवाल केला आहे. त्यानुसार भाजपच्या नगरसेविका गायत्री खडकेंचा उपस्थित राहण्यात पहिला नंबर आहे. त्यांची उपस्थिती 96% आहे. तर सगळ्यात कमी म्हणजे 30% उपस्थिती रेश्मा भोसले यांची आहे. मुख्य सभेत भाजप आणि मनसेचे सदस्य जास्त उपस्थित असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कांग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आहे.