नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये ४५.८८ कोटी मिळकत कर जमा
पुणे : २०२२-२३ हे आर्थिक वर्ष सुरु झालेले असून, या आर्थिक वर्षातील मिळकत कर बिले तयार करून व संबंधित मिळकतधारकांना मिळकत कराचा भरणा पुणे महानगरपालिकेकडे जमा करता यावा, यासाठी योग्य ती कार्यवाही दिनांक ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात आलेली होती. तसेच सुमारे ९,४१,००० इतक्या मिळकत कराची बिले माहेमार्च २०२२ मध्येच छपाई करून, पोस्ट विभागामार्फत वितरणासाठी दिलेली आहेत. त्यामुळे पहिल्या ४ दिवसांत २ दिवस शासकीय सुट्टी असून सुद्धा ४५.६८५ इतक्या मिळकतधारकांनी ४५.८८कोटी इतकी रक्कम मिळकत करापोटी जमा केलेली आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
: 31 मे पर्यंतच्या सवलतीचा लाभ घ्या
कानडे यांच्या माहितीनुसार सुमारे ९५.२५% इतकी रक्कम ऑनलाईन प्रणालीद्वारे जमा झालेली आहे. सन २०२२-२३ चा मिळकत कर जमा करता यावा, यासाठी खात्याकडे उपलब्ध असलेल्या भ्रमणध्वनीच्या आधारे ८,८८,२०७ इतक्या मिळकतधारकांना एसएमएसद्वारे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच ६,६९,५१२ इतक्या मिळकतधारकांना कर भरणे बाबत इमेलद्वारे कळविणेत आले आहे. ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु.२५,०००/- पेक्षा कमी आहे, अशा मिळकतधारकांना मिळकत कराच्या सर्व साधारण करामध्ये १०% इतकी सूट, तर ज्या मिळकतीची वार्षिक करपात्र रक्कम रु. २५,००१/- पेक्षा जास्त आहे, अशा मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतकराच्या सर्व साधारण करामध्ये ५% इतकी सवलत देण्यात येत आहे. सदरची सवलत ही दिनांक ३१ मे २०२२ पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी मिळकतधारकांनी त्यांचा मिळकत कर जमा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
: सुट्टीच्या दिवशी देखील कर भरणा केंद्रे सुरु राहणार
तसेच मिळकत कर बिल प्राप्त करून घेणेसाठी अथवा मिळकत कर भरणेसाठी मिळकतधारकांनी त्यांचा पूर्वीचा मिळकत कर क्र.सांगून माहिती देण्यासाठी मनपा मुख्य कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापित करण्यात आला
असून, त्या ठिकाणी मिळकत कराविषयी माहिती देणेसाठी कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. त्यासाठी ०२०-२५५०११५९ या क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे मिळकत कर विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून देखील याबाबतची माहिती प्राप्त करून देण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation. org‘ या संकेतस्थळावस्न मालमत्ता कर भरणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन मिळकत कर जमा करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay. UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon
Pay, NEFT-RTGS, etc.
असून, त्या ठिकाणी मिळकत कराविषयी माहिती देणेसाठी कर्मचारी उपलब्ध असणार आहेत. त्यासाठी ०२०-२५५०११५९ या क्रमांकावर संपर्क साधल्यास माहिती उपलब्ध होऊ शकते. तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे मिळकत कर विभागाकडील कर्मचाऱ्यांकडून देखील याबाबतची माहिती प्राप्त करून देण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे “propertytax.punecorporation.
NetBanking, Credit Card, Debit Card, Bharat QR Code, UPI – Google Pay. UPI – PhonePe, Post_Debit_Card, UPI, Pos_Credit_Card, EBPP, Mobile Wallet, paytm, Amazon
Pay, NEFT-RTGS, etc.
त्याचप्रमाणे दिनांक ३१/०५/२०२२ पर्यंत सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील मिळकत कर भरणा केंद्रे सुरु राहणार
COMMENTS