Ryat Swabhimani Association | समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना

HomeपुणेBreaking News

Ryat Swabhimani Association | समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना

Ganesh Kumar Mule Dec 28, 2022 2:26 AM

MNGL App | एमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
7th Pay Commission |  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी | भविष्य निर्वाह निधीबाबत नवीन अपडेट जारी|  नियम बदलले
Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना

 

नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन जवळपास दीड वर्ष पुर्ण होत आले. सर्वच स्तरातून पुणे महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महानगरपालिका प्रशासन या संपूर्ण 23 गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. समाविष्ट केलेली 23 गाव व हिंजवडी एकत्र करून वेगळी नगरपालिका स्थापन करावी व त्यामधून आमचा विकास करावा हा एकमेव पर्याय उरला आहे. अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी केली आहे.

कानवटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार या समाविष्ट सर्व 23 गावांमध्ये ना आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, ना गाडी नेण्यासारखा रस्ता झाला आहे आणि रात्री बाहेर पडणे म्हणजे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून कोणती लाईटची व्यवस्था केली नाही . प्रश्न पडतो की महानगरपालिका कोणाचा विकास करण्यात व्यस्त आहे नागरिकांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करीत पुणे महानगरपालिका कोणाचा विकास करू पाहते.

मुख्यमंत्री कार्यालयासोबत मागील सहा महिन्यापासून वारंवार पत्र व्यवहार करूनदेखील याबाबत अजूनही कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. मग आम्हाला कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरंच अनाथांचे नाथ आहात का? तुम्हाला नागरिकांची काळजी आहे का? का प्रशासन तुमचा ऐकत नाही?
आता एक तर आम्हाला मुलभूत सोई सुविधा द्या अन्यथा आम्हाला पुणे महानगरपालिकेमधून बाहेर काढा कारण आम्हाला असं वाटत नाही की पुणे महानगरपालिकेमध्ये राहून आमचा विकास होईल म्हणून नव्याने समाविष्ट केलेली 23 गाव व हिंजवडी एकत्र करून वेगळी नगरपालिका स्थापन करावी व त्यामधून आमचा विकास करावा हा एकमेव पर्याय उरला आहे.
या सर्व बाबतीत आपण सकारात्मक विचार करून कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गाने पुढे जावे लागेल, अशी माहिती रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी दिली.