थकबाकी असलेल्या 121 मिळकती टॅक्स विभागाने केल्या सील
| उपायुक्त अजित देशमुख यांची माहिती
महापालिकेच्या मिळकत कर आकारणी आणि कर संकलन विभागाने आज एका दिवसांत मिळकतकर थकलेल्या तब्बल १२१ मिळकती सील केल्या आहेत. या थकबाकीदारांकडे ११ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख यांनी दिली.
यंदाच्यावर्षी पहिल्याच दोन महिन्यांत 1 हजार कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न अधिक आहे.
यानंतर आता या विभागाने मोठ्या थकबाकीदारांकडे पुन्हा मोर्चा वळविला आहे. आज एका दिवसांत विशेष मोहीमेअंतर्गत आज एका दिवसांत मिळकतकर थकलेल्या तब्बल १२१ मिळकती सील केल्या आहेत. या थकबाकीदारांकडे ११ कोटी ४२ लाख रुपये थकबाकी आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर २४ मिळकत धारकांनी तातडीने ४५ लाख रुपये थकबाकी भरली आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh ) यांनी दिली.