12 Rules for Life by Jordan B Peterson | तुम्ही अव्यवस्थेत जगत आहात का? तुम्हाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग हवाय का? तर मग हे पुस्तक, यातील नियम तुम्ही वाचलेच पाहिजे! 

HomeBooks

12 Rules for Life by Jordan B Peterson | तुम्ही अव्यवस्थेत जगत आहात का? तुम्हाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग हवाय का? तर मग हे पुस्तक, यातील नियम तुम्ही वाचलेच पाहिजे! 

Ganesh Kumar Mule Dec 22, 2024 1:50 PM

National Reading Day 2023 | राष्ट्रीय वाचन दिवस २०२३ | का साजरा केला जातो राष्ट्रीय वाचन दिवस! | महत्व आणि इतिहास जाणून घ्या! 
You are Prize | महापालिका कर्मचाऱ्यांनो आणि अधिकाऱ्यांनो तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या! | तुमच्यापेक्षा कुणीही आणि काहीही महत्वाचे नाही! 
Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना पुस्तकांच्या खरेदीवर १०० रुपये सवलत|  सोसायटीमध्ये वाचनालयासाठी १००० रुपयांची सवलत

12 Rules for Life by Jordan B Peterson | तुम्ही अव्यवस्थेत जगत आहात का? तुम्हाला उदात्त जीवन जगण्याचा मार्ग हवाय का? तर मग हे पुस्तक, यातील नियम तुम्ही वाचलेच पाहिजे!

 

12 Rules for Life Book Review – (The Karbhari News Service) – फक्त नियम वाचले म्हणून कधी आयुष्य सुधारते का? असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल. मात्र हे पुस्तक आणि यातील नियम तुम्हाला तुमचा हा गैरसमज दूर करायला मदत करेल. आज आपण खरेच अव्यवस्थेत जगत आहोत. अशा काळात हे पुस्तक तुम्हाला सुव्यवस्था शिकवेल. उदात्त जीवनाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला सापडेल. त्यासाठी हे नियम वारंवार वाचून त्यावर अंमल करावा लागेल.  चला तर मग नियम समजून घेऊया! (12 Rules for Life Summary)

नियम १ – खांदे न पाडता ताठ उभे राहा

तुमची ढब काळजीपूर्वक तयार करा. खांदे पाडणे आणि कुबड काढणे सोडून द्या. आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे बोला. ज्याप्रमाणे इतरांना त्यांच्या मनातील इच्छा मांडण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे किमान तितकाच तुमच्या इच्छा मांडण्याचा तुम्हालाही अधिकार आहे. तुमच्या इच्छा इतरांसमोर मांडा. ताठ मानेने चाला आणि नजर न झुकवता ती थेट समोर ठेवा. धोकादायक बनण्याचे धाडस ठेवा.

नियम २ – जिला मदत करणे ही तुमची जबाबदारी आहे, अशी व्यक्ती म्हणून स्वतःकडे पाहा 

तुम्ही काही प्रमाणात आदराला पात्र असता. तुम्ही जितके स्वतःच्या दृष्टीने महत्वाचे असता, तितकेच इतरांच्या दृष्टीनेही महत्वाचे असता; म्हणून तुम्हाला नैतिक दृष्ट्याही तुमची काळजी घेणे भाग असते. तुम्ही तुमच्या महत्वाच्या आणि प्रिय लोकांची जितकी काळजी घ्याल, त्यांना जितकी मदत कराल, तितकीच तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःशीही चांगले वागले पाहिजे. तुम्ही कुठे चालला आहात, हे तुम्ही निश्चित केले पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वतः साठी घासाघीस करू शकाल आणि साहजिकच अखेरीस तुम्ही संतप्त, सुडाने पेटलेले आणि क्रूर बनणार नाही. तुम्ही स्वतःची तत्वे तयार केली पाहिजेत. त्यामुळे इतरांकडून तुम्ही गैरफायदा घेण्याच्या विरोधात स्वतःचे संरक्षण करू शकाल. तुम्ही स्वतःला काळजीपूर्वक शिस्त लावलीच पाहिजे. स्वतःला दिलेली वचने तुम्हाला  पाळावीच लागतील आणि स्वतःला बक्षिशी देखील द्यावे लागेल.

नियम ३ – तुमचे हित जपणाऱ्या लोकांशी मैत्री करा 

जी व्यक्ती या व्यक्तीला अधिक वाईट जागा बनवत असते, तिला पाठबळ देण्याचे नैतिक बंधन तुम्ही मानत असाल तर तो अगदीच विरोधाभास आहे. ती एक चूक आहे. त्या उलट ज्या लोकांना गोष्टी अधिक वाईट करण्याची नव्हे तर अधिक चांगल्या करण्याची इच्छा असते, अशा लोकांची तुम्ही निवड केली पाहिजे. तुमच्या आयुष्यात सुधारणा झाल्याचे दिसल्यावर ज्या लोकांच्या आयुष्यातही सुधारणा होईल, अशा लोकांशी जोडले जाणे ही गोष्ट योग्य आणि प्रशंसनीय असते. तुमच्या बाबतीत उत्तम गोष्टीच घडाव्यात, अशी इच्छा असलेल्या, तुमच्यासाठी उत्तम गोष्टींची इच्छा धरणाऱ्या आणि तुमचे हित पाहणाऱ्या लोकांशीच मैत्री करा.

नियम ४ – तुम्ही काल कोण होतात त्याच्याशी स्वतःची तुलना करा, दुसरा कोणीतरी आज जो कुणी आहे त्याच्याशी स्वतःशी तुलना करू नका 

लक्ष द्या. तुमच्या भौतिक आणि मानसिक परिसरावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला भंडावून सोडत असलेल्या, तुम्हाला स्वस्थ राहू देत नसलेल्या, आणि तुम्ही सोडवू शकत असाल, सोडवली पाहिजे अशा एखाद्या समस्येकडे लक्ष द्या. समस्या सोडवण्याची इच्छा असलेली एखादी गोष्ट आढळेपर्यंत शोध घेत रहा. टी तुम्ही सोडवू शकत असाल आणि ती सोडवायची इच्छा असेल, तर ती सोडवा. त्या दिवसांपुरती तेवढीच गोष्ट पुरेशी असेल. आपल्यासाठी मागा. मग ते तुम्हाला मिळेल. दरवाजा ठोठावा आणि मग तो उघडेल. जर तुम्ही आपल्याला खरोखरच हवे असल्याप्रमाणे मनापासून मागितले आणि जणू काही तुम्हाला आत प्रवेश करायचाच आहे, म्हणून दरवाजा ठोठवला तर तुम्हाला आयुष्यात थोड्याश्या प्रमाणात, भरपूर प्रमाणात आणि संपूर्ण सुधारणा करण्याची संधी मिळेल. तुम्ही काल कोण होतात याच्याशी स्वतःची तुलना करा. दुसरा कोणीतरी आज कोण आहे, त्याच्याशी स्वतःची तुलना करू नका.

नियम ५ – तुमची मुले तुमच्या मर्जीतून उतरतील, असे काहीही त्यांना करू देऊ नका 

काहीही झाले तरी तुमच्या मुलांवर तुमचे प्रेम असते. त्यांच्या कृतीमुळे ती तुम्हालाच आवडत नसली, तर ती तुमच्या इतकी त्यांची काळजी नसलेल्या किंवा त्यांची फारशी पर्वा नसलेल्या इतर लोकांवर त्यांच्या वर्तनाचा काय परिणाम  होईल याच विचार करा. ते इतर लोक त्यांना वगळणुकीची वागणूक देऊन किंवा अतिशय मोठी कामगिरी सोपवून कठोर शिक्षा करतील. हे घडू देऊ नका. त्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट म्हणजे, तुमच्या छोट्या राक्षसाना कोणत्या गोष्टी इष्ट आहेत, आणि अनिष्ट आहेत त्या सांगा. त्यामुळे कुटुंबाबाहेरच्या जगात ती सुसंस्कृत नागरिक बनतील.
तुम्हाला तुमची मुले आवडणार नाहीत, ती तुमच्या मर्जीतून उतरतील अशा कुठल्याही गोष्टी त्यांना करू देऊ नका.

नियम ६ – जगावर टीका करण्याआधी स्वतःच्या घराला शिस्त लावा 

तुमच्या आयुष्याची तुम्ही साफसफाई केली आहे का? ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, हे तुम्हाला माहीत आहे, त्या करणे थांबवू लागा. आजपासून त्या थांबवण्यास सुरुवात करा. तुम्ही करत असलेली गोष्ट निश्चितपणे चुकीची आहे, हे तुम्हाला माहीत असेल तर, ती चुकीची असल्याचे तुम्हाला कसे काय माहीत आहे, वगैरे प्रश्न प्रश्न उपस्थित करण्यात वेळ वाया घालवू नका. अप्रासंगिक आणि भलत्याच वेळी विचारलेले प्रश्न ज्ञान देण्याऐवजी संभ्रमात टाकू शकतात. शिवाय तुम्ही कृती करायला लागण्याऐवजी भलतीकडे जाता. प्रत्येक व्यक्ती स्वतःला पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. कारण ती अतिशय गुंतागुंतीची असते. म्हणूनच आता आपण थांबले पाहिजे, याचे किंचितसे जरी आकलन झाले तरी सरळ थांबा. तुम्हाला दुर्बलता आणि शर्मिंदेपणा वाटू देणाऱ्या गोष्टी बोलणे थांबवा. फक्त तुम्हाला ज्या गोष्टी खंबीर, भक्कम बनवतात त्याच गोष्टी बोला.
तुमच्या डोक्यात खोटारडेपणाच्या गोष्टी भरणे तुम्ही बंद केले की, तुमचे डोके मोकळे होऊ लागेल. अनधिकृत कृतीने तुमच्या अनुभवाचा विपर्यास करणे तुम्ही थांबवले की, तुमच्या अनुभवात सुधारणा होईल. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या नवीन, अधिक सूक्ष्म गोष्टी तुम्हाला सापडू लागतील, त्या करणे देखील थांबवा. जगावर टीका करण्याआधी तुमच्या स्वतःच्या घराचा आधी विचार करा. त्याला शिस्त लावा. त्याला परिपूर्ण शिस्तबद्धतेने सुरळीत, व्यवस्थित करा.

नियम ७ – अर्थपूर्ण गोष्टींचा पाठपुरावा करा (स्वार्थी किंवा स्वहिताच्या गोष्टीचा नव्हे) 

उद्दिष्ट निश्चित करा. लक्ष केंद्रित करा. तुम्हाला जी गोट निश्चित करायची आहे ती करा. जी सुधारणा करता येत असेल ती करा. तुमच्या ज्ञानाविषयी, तुमच्याकडच्या माहितीविषयी गर्व बाळगू नका. विनयशील राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा.
तुमच्या आयुष्यात अर्थ येणे ही गोष्ट तुम्हाला जे हवे असते तसे आयुष्य असण्याहून अधिक चांगली असते. कारण कदाचित तुम्हाला काय हवे आहे किंवा तुम्हाला खरोखरच कशाची गरज आहे, ते तुम्हाला माहितच नसते. अर्थ हा स्वतःच्या मर्जीने स्वतःसाठी तुमच्याकडे येणारी गोष्ट असते. ज्यावेळी अर्थ प्रकट होतो त्यावेळी तुम्ही त्याचे अनुसरण करू शकता. त्यांच्यासाठी पूर्व अटी तयार करू शकता. तुम्ही अर्थाचा पाठपुरावा करू शकता.
अर्थ हा मार्ग असतो. तुमच्या आयुष्याला अधिक समृद्धीकडे, वैपुल्याकडे नेणारा मार्ग असतो. ज्यावेळी तुम्हाला प्रेमाकडून आणि खरे बोलण्याकडून मार्गदर्शन मिळत राहते, त्यावेळी आयुष्याच्या अशा वैपुल्याच्या स्थानी तुम्ही राहता. त्यावेळी तुम्हाला काहीही नको असते किंवा कदाचित तुम्हाला काही हवे असले तरी ते स्थान तुमच्या त्या इच्छेवर प्रभुत्व मिळवते. म्हणून अर्थपूर्ण असेल तेच करा. स्वार्थीपणाची गोष्ट करू नका.

नियम ८ – खरे बोला. निदान खोटे बोलू नका. 

तुम्हाला ज्यावेळी काय करावे हे समजत नसेल, त्यावेळी तुम्ही काय केले पाहिजे? खरे बोला. सत्य सांगा.
तुम्ही इतरासमोर स्वतःला प्रकट केले नाही, व्यक्त केले नाही तर तुम्ही स्वतः समोरही स्वतःला प्रकट करू शकत नाही. तुम्हालाच तुम्ही दडपून टाकता. याचा अर्थ असा ही होतो कि, गरजेमुळे जबरदस्तीने तुमच्यातील ज्या बऱ्याचश्या गोष्टी बाहेर आल्या असत्या त्या कधीही बाहेर येत नाहीत.
तुम्ही स्वतःचा विश्वासघात करता. तुम्ही खोट्या गोष्टी बोलता. खोट्या गोष्टी करता. त्यावेळी तुम्ही तुमचे चारित्र्य दुर्बल बनवता.
लबाडी, कपटीपणाच लोकांना असह्य दुःख देतो. या लबाडीमुळेच मानवी आत्मे क्रोधाने आणि सूडभावनेने भरून जातात. ही लबाडी, कपटीपणाच भयानक मानवी दुःखाची, यातनांची निर्मिती करतो. या दगलबाजीनेच संस्कृतीचा जवळजवळ सत्यानाश केला. याचाच आज आपल्याला सर्वात गहन गंभीर धोका आहे.
जर तुमचे आयुष्य जसे असू शकले असते तसे नसेल तर सत्य बोलण्याचा प्रयत्न करा.

नियम ९ – तुम्ही ज्या व्यक्तीचे बोलणे ऐकत असता, तिच्याकडे तुम्हाला माहित नसलेली एखादी गोष्ट असू शकते, असे समजा 

आपल्यापैकी बहुसंख्य लोक लक्षपूर्वक ऐकू शकत नाहीत. आपल्याला मूल्यमापन करण्याची सवयच जडून गेलेली असते. कारण लक्षपूर्वक ऐकणे ही खूपच धोकादायक, जोखमीची बाब असते. पहिली गोष्ट म्हणजे लक्षपूर्वक ऐकण्यासाठी धाडसाची गरज असते आणि आपल्याकडे ते नेहमीच असते असे नाही.
स्वतःचे आणि तुम्ही ज्यांच्याशी बोलत असता त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्ञानात फक्त आधी मिळालेली माहितीच नसेल तर माहितीचा सातत्याने शोध घेण्याचा ध्यास मिळेल. असा ध्यास हे ज्ञानांचे सर्वोच्च स्वरूप असते.

नियम १० – बोलण्यात नेमकेपणा ठेवा

तुम्हाला खरोखरच जे म्हणायचे आहे तेच बोला, त्यामुळे आपल्याला काय सांगायचे आहे ते तुम्हालाही समजू शकेल. तुम्ही जे बोलता तेच करा. त्यामुळे तसे करण्याने काय घडते ते तुम्हाला समजू शकेल. त्यानंतर लक्ष द्या. तुमच्या चुकांची नोंद घ्या. त्यांची नीट मांडणी करा. त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.  अशा प्रकारे तुम्हाला आयुष्यातील अर्थ उमगेल. तोच तुमच्या आयुष्याचा शोकांतिके पासून रक्षण करेल.

नियम ११ – स्केटबोर्डिंग करणाऱ्या मुलांना त्रास देऊ नका 

जर स्त्रिया शारिरीक दृष्ट्या बलवान असतील तर त्यांना मुलगे नको असतात. त्याना पुरूष हवे असतात. (एका संशोधना नुसार उत्पन्न, शिक्षण, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, प्रभुत्व किंवा श्रेष्ठत्व आणि सामाजिक दर्जा या सर्व बाबतीत स्त्रियांच्या तुलनेत खूपच वरचढ असणारा असा पुरुष स्त्रियांना हवा असतो. मात्र अशा पुरुषांची संख्या खूपच कमी असते.) ज्यावेळी तरुण मुले मर्द गडी होण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी जी भावना या प्रक्रियेत हस्तक्षेप करते ती पुरूष इतकीच महिलांना मित्रत्वाची वाटत नाही. ज्यावेळी मुली त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी हीच भावना त्या संदर्भात त्यांना हरकत घेते. तुम्ही हे करू शकत नाही, ती खूपच धोकादायक गोष्ट आहे, असं याच भावनेतून त्यांना सांगितलं जात. ही भावना जाणिवेला नाकारते. ती मानवता विरोधी असते. जर तुम्हाला कणखर, कडक पुरुष धोकादायक वाटत असतील तर थोडे थांबा आणि दुर्बल पुरुषांमध्ये काय काय करण्याची क्षमता असते ते बघा. स्केटबोर्डिंग करणाऱ्या मुलांना रोखू नका. त्यांना मोकळे सोडून द्या.

नियम १२ – रस्त्यात एखादे मांजर दिसले तर त्याला पाळा

असे समजा कि, तुम्ही सहज फिरायला बाहेर पडलेले आहात. अचानकच तुमचे डोके गरगरू लागते. त्याच वेळी तुमची नजर एखाद्या मांजरावर पडते. अशा तुम्ही त्याच्याकडे फक्त १५ सेकंद जरी लक्षपूर्वक पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की, अस्तित्वाचे आश्चर्य हे त्याच्या बरोबर येणाऱ्या दारुण दुःखाची भरपाई करणारे असते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0