समाविष्ट गावांना पाणी द्या
: राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मुख्य सभेत मागणी
: नगरसेवक गणेश ढोरे यांचे सभागृहात कावड घेऊन आंदोलन
पुणे. महापालिका हद्दीत राज्य सरकारच्या निर्देशानुसार 34 गावांचा समावेश केला आहे. मात्र या गावांना मूलभूत सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होताना दिसते. या गावांना पाण्याची सुविधा देताना देखील अडचणी येत आहेत. त्यामुळे बुधवारच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. नगरसेवक गणेश ढोरे यांनी तर सभागृहात पाण्याची कावड आणली आणि उरुळी व फुरसुंगीला पाणी सुरळीत करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी आयुक्तांना हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले.
: महापौरांचे आयुक्तांना आदेश
बुधवारची मुख्य सभा सुरु झाल्याबरोबर नगरसेवक गणेश ढोरे यांनी सभागृहात घोषणा द्यायला सुरुवात केली. ढोरे यांनी मागणी केली कि उरुळी आणि फुरसुंगी ला अजूनही टँकर द्वारे पाणीपुरवठा होतोय. त्यासाठी महापालिका 8 कोटी खर्च करते आहे. त्यापेक्षा जर पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी दिले तर ही समस्या संपेल. यावर महापालिका प्रशासनाने अमल करावा. त्यांनतर मग राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी समाविष्ट गावांना पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. महापौरांच्या डायस समोर येऊन सर्व नगरसेवकांनी घोषणा देत पाणी सुविधा देण्याची महापौरांना मागणी केली. त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना नागरसेवकांसोबत बैठक घेऊन प्रश्न मिटविण्याचे आदेश दिले.
उपनगरातील नगरसेवक गणेश ढोरे यांनी सन २०१७ साली ११ गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली. त्या गावांना पुरेसे पाणी मिळत नाही म्हणून आज आपण सभागृहात महाविकास आघाडी म्हणून आंदोलन केले. परंतु त्याच्यावर आता भविष्य काळामध्ये आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे. पर्यायी अशी व्यवस्था आयुक्त साहेब तुम्ही करा. ज्या पद्धतीने २३ गावे पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण तातडीची कामे उदा. पाणी पुरवठा, ड्रेनेज लाईन टाकणे, विद्युत विषयक, रस्ते करणे असेल ही कामे तातडीने आपण हातामध्ये घेतली आणि या परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याचे फार मोठे काम आपण केले त्याबद्दल मी महापालिका आयुक्त साहेब व सर्व प्रशासनाचे मनापासून अभिनंदन करतो .
COMMENTS