वाहन कराच्या 50% रक्कम शहराच्या रस्ते विकासासाठी द्यावी   :काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची आरटीओ कडे मागणी   : आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पत्र पाठवले

Homeपुणेमहाराष्ट्र

वाहन कराच्या 50% रक्कम शहराच्या रस्ते विकासासाठी द्यावी :काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची आरटीओ कडे मागणी : आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पत्र पाठवले

Ganesh Kumar Mule Sep 01, 2021 4:44 PM

Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांत सद्यस्थितीत 8.35 TMC पाणी | पुणेकरांना दिलासा | खडकवासला धरण 50% भरले
G 20 Summit in Pune | जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन
Cloth vending Machine | पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी मिळवा कापडी पिशव्या | महापालिकेस ८ मशीन प्राप्त

वाहन कराच्या 50% रक्कम शहराच्या रस्ते विकासासाठी द्यावी

:काँग्रेस गटनेते आबा बागूल यांची आरटीओ कडे मागणी

: आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पत्र पाठवले

पुणे: पुणे शहरात दरवर्षी लाखो नव्या वाहनांची नोंद होते. त्यासाठी आकारले जाणारे वाहन कराची रक्कम राज्य शासनाकडे दिली जाते. ती ५० टक्के रक्कम पुणे शहराच्या रस्ते विकास कार्यक्रमासाठी दिली जावी या साठी पुणे मनपा काँग्रेस गटनेते आबा बागूल यांच्या मागणीचे पत्र पुणे आरटीओने पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविल्याची माहिती आबा बागूल यांनी दिली.
महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीमध्ये यामुळे  मोठी भर पडणार असून त्याचा पुणे महानगरपालिकेने सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे असे आबा बागूल म्हणाले. पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीसाठी ऍमिनिटी स्पेस भाड्याने देण्यापेक्षा अशा नवीन कल्पनांच्या आधारे उत्पन्न वाढ करून घ्यावी. त्यादृष्टीने पुणे शहरात नोंदविल्या जाणा-या नव्या वाहनांच्या नोंदणी करताना वाहन कराची रक्कम ५० टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेला रस्ते विकासासाठी मिळावी. ही मागणी रास्त असून पुणे आरटीओने मागणीपत्र राज्य शासनाकडे पाठविल्याचे कळविले आहे. त्याबद्दल मी पुणे आर. टी.ओ. ला धन्यवाद देतो. ही मागणी मान्य झाल्यास राज्यातील सर्वच शहरे, गावे यांना याचा फायदा होईल. असे बागुल म्हणाले.