नागरिकांना पीएमपीएमएलची गणेशोत्सवाची भेट  : पाच रुपयात प्रवास   : नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नांना यश

Homeपुणे

नागरिकांना पीएमपीएमएलची गणेशोत्सवाची भेट : पाच रुपयात प्रवास : नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नांना यश

Ganesh Kumar Mule Sep 08, 2021 7:51 AM

Katraj-Kondhwa Road Accident | कात्रज-कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमी चौकात कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात | अपघातानंतर खासदार सुळे यांची मागणी
PMPML | Bonus | पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | कर्मचारी संघटना आक्रमक
Punekar be prepared | Now 1% interest per month if you keep the water bill in arrears!

नागरिकांना पीएमपीएमएलची गणेशोत्सवाची भेट

: पाच रुपयात प्रवास

: नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे:  पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजेच पुण्याची लाइफलाइन असलेली पीएमपीएमएल बस सेवा आता पद्मावती, सहकारनगर परिसरातील नागरिकांना केवळ पाच रुपयांत उपलब्ध होणार आहे. नगरसेवक महेश वाबळे यांच्या विशेष प्रयत्नातून या बस सेवेचा शुभारंभ महापौर मुरलीधर मोहोळ, पीएमपीएल चे दत्तात्रय झेंडे यांच्या उपस्थित संपन्न झाला.

: नागरिकांकडून करण्यात येत होती मागणी

सहकारनगर नागरिक मंचाच्या वतीने नुकतेच आढावा बैठक घेण्यात आली होती, यामध्ये सहकारनगर भाग दोन ते स्वारगेट या मार्गावर बस सेवा उपलब्ध व्हावी अशी नागरिकांनी मागणी केली होती. दरम्यान तीन दिवसांत हि बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या अंतर्गत सहकारनगर भागातील नागरिकांना अवघ्या ५ रुपयांत प्रवास करता येणार आहे. सकाळी ६.१५ वाजता पहिली बस सुरू होईल, त्यानंतर दर चाळीस मिनिटाला ही सेवा उपलब्ध असेल.  यावेळी नगरसेवक महेश वाबळे म्हणाले शहरात वाढती दुचाकी, चारचाकी संख्या कमी करण्यासाठी पीएमपीने स्वस्त व सुलभ सेवा आवश्यक असून वाहतूक कोंडी सोडविण्या साठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या या उपक्रमाचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे. सहकारनगर भाग दोन ते स्वारगेट दरम्यान दर चाळीस मिनिटाला नागरिकांना पाच रुपयात प्रवास करता येणार.  रस्त्यावरच ट्रॅफिक कमी करायचं असेल तर चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देणं आवश्यक आहे. वेळ आणि पैसे वाचत असतील तर लोक नक्की या सुविधेचा वापर करतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी हरिष परदेशी , प्रशांत थोपटे ,अमोल गडकरी, स्नेहल देशपांडे, विनय गोखले, बापू पाटील, के के संघजारका, कीर्ती पुराणिक, अमित शहाणे, महेश खळदकर, इंद्रनील सदलगे, अमित अभ्यंकर, नितीन करंदीकर ,प्रणव उंडे आकाश पायाला, त्र्यंबक अवचिते , विनोद गायकवाड उपस्थित होते.
 शहरात वाढती दुचाकी, चारचाकी संख्या कमी करण्यासाठी पीएमपीने स्वस्त व सुलभ सेवा आवश्यक असून वाहतूक कोंडी सोडविण्या साठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या या उपक्रमाचा नागरिकांना चांगला फायदा होणार आहे.

             महेश वाबळे, नगरसेवक.