गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला लकडी पूलावरील मेट्रो पूल अडथळा ठरणार   : तात्काळ बैठक बोलवा   : काँग्रेस गटनेता आबा बागुल यांची मागणी

Homeपुणे

गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला लकडी पूलावरील मेट्रो पूल अडथळा ठरणार : तात्काळ बैठक बोलवा : काँग्रेस गटनेता आबा बागुल यांची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 07, 2021 3:02 AM

PMC Theatre | स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला सुमारे ५० कोटी रुपये इतका खर्च | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची  नाट्यगृहाला भेट
Vaikunth Crematorium | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
Chandni Chowk | चांदणी चौकातील जुना पूल पडण्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात

 गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला लकडी पूलावरील मेट्रो पूल अडथळा ठरणार

: तात्काळ बैठक बोलवा

: काँग्रेस गटनेता आबा बागुल यांची मागणी

पुणे: पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्वस मोठया उत्साहात साजरा होतो. या उत्सवास १२५ हून अधिक वर्ष झाले असून ही परंपरा पुणेकर मनोभावाने जपत आहेत. पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून ५.४५ ते ६ मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे २०फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरवणूकीस मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी काँग्रेस गटनेता आबा बागुल यांनी केली आहे.

: गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट

कोरोना काळात मागील वर्ष व यंदाच्या वर्षात गणेशोत्सव साजरा करणेसाठी शासनाने अटी व शर्ती दिलेल्या असून कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक यामध्ये विसर्जन मिरवणूकीस अनन्य महत्व आहे. विसर्जन मिरवणूकीमध्ये मोठे आकर्षक रथ, विदयुत रोषणाई, समाजास प्रबोधन व मार्गदर्शन करणारे देखावे, कलाकारांना व्यासपीठ उलब्ध करणारे देखावे अशा प्रकारची सजावट गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठया उत्साहाने करून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता याठिकाणाहून विसर्जन करणेस अलका चौक येथून मिरवणूक घेवून येतात. अलका चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपती, मानाचे उर्वरित गणपती व शेकडो गणेश मंडळांच्या मिरवणूका लकडी पूलावरून खंडूजी बाबा चौक येथील विसर्जन घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करतात व कर्वे रस्यावरून एस.एम जोशी पूल मार्गे तसेच गोखले रस्ता व अन्य रस्ते येथून गणेश मंडळे परत जातात. कर्वे रस्त्यावर देखील मेट्रोचे स्टेशन झालेले असून याठिकाणाहून जाताना अडथळा निर्माण होणार आहे. विसर्जन मिरवणूकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण ३५ फुट ते ४५ फुटापर्यंत असते. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण जगभरातून बघितले जाते. परदेशातून नागरिक खास पुणे शहराची विसर्जन मिरवणूक बघणेस येतात.  पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून ५.४५ ते ६ मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे २०फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास विसर्जन मिरवणूकीस मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. याबाबत असंख्या गणेश भक्तांनी आमचेकडे याविषयी तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी केलेली आहे. श्रींचे विसर्जन मिरवणूक हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय असल्याने सदर विषयी विचार विनिमय करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही परंपरा थांबविता येणार नाही व विसर्जन मिरवूणकीस अडथळा होत असल्यास यावर सविस्तर चर्चा करणेसाठी मेट्रोचे अधिकारी, महानगरपालिका प्रशासन व पक्षनेते यांची बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त यांचे कडे केलेली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0