काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड  : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस

Homeमहाराष्ट्र

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस

Ganesh Kumar Mule Sep 03, 2021 6:02 AM

Tata Smarak Bharati 2024 | टाटा स्मारक हॉस्पिटल येथे माजी सैनिकांची भरती
Baramati Latest News | बारामती शहर विकासाचे रोल मॉडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Irshalwadi Children | चंद्रकांतदादा पाटील यांची ईर्शाळवाडीच्या मुलांसोबत दिवाळी साजरी

काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी चेतन चव्हाण यांची निवड

: राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वारस

पुणे:  शरद पवारांचे तीसऱ्या पिढीचे वारस रोहित पवार व पार्थ पवार राजकारणात सक्रीय झाल्याचे आपण पाहिले आहे. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामध्ये आता आणखी एक नाव आग्रहाने घ्यावे लागणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या नुकत्याच जाहीर झालेल्या नूतन कार्यकारीणीमध्ये चेतन चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे देखील वारस महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झालेले दिसत आहे.
चेतन चव्हाण यांनी युवक कॉंग्रेसच्या विविध पदांवर यापूर्वी  काम केले आहे. परंतु महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या या कार्यकारीणी मध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिवपद सोपवण्यात आले आहे. यामुळे ते खऱ्या अर्थाने राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या पाठीमागे काय उद्देश आहे ते येत्या काळात समजेलच परंतु, स्व यशवंतराव चव्हाण यांचे नातूच आता काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याने याची चर्चा होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0