येरवडा कारागृहातील कैदयांना कोरोना लस द्या
: शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांची मागणी
: महापौरांना दिले पत्र
पुणे: येरवडा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैदयांचे कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गापासुन संरक्षण करण्यासाठी त्याचे लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारागृहातील परिसरात तात्पुरते कोरोना लसीकरण केंद्र चालु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करा. अशी मागणी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आनंद रिठे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
: तात्पुरते कोरोना लसीकरण केंद्र बनवा
रिठे यांच्या पत्रानुसार कोरोना काळात पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व सर्व लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त नागरिकांचे यशस्विरित्या लसीकरण होण्यासाठी राबत आहेत. परंतु पुणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या येरवडा कारागृहातील कैदयांना तेथील गर्दीमुळे कोरोना होण्याचा व तो अधिक वेगाने पसरण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैदयांचे या जीवघेण्या संसर्गापासुन संरक्षण करण्यासाठी त्याचे लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. तरी येरवडा कारागृहातील परिसरात तात्पुरते कोरोना लसीकरण केंद्र चालु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. असे रिठे यांनी पत्रात म्हटले आहे.
COMMENTS