गणेश उत्सवात फिरत्या विसर्जन हौदासाठी महापालिका खर्च करणार सव्वा कोटी   : खर्च वाढता वाढे   : स्थायी समिती समोर प्रस्ताव

HomeपुणेPMC

गणेश उत्सवात फिरत्या विसर्जन हौदासाठी महापालिका खर्च करणार सव्वा कोटी : खर्च वाढता वाढे : स्थायी समिती समोर प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Sep 08, 2021 3:24 PM

DHARA 2023 | पुण्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सहा कलमी उपाययोजना | महापालिका आयुक्त
Sinhgadh Road Flyover: पुणेकरांनी टीका केली; पण मेट्रो सुरु झाल्याच्या कामाचा आनंद : नितीन गडकरी
PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ

गणेश उत्सवात फिरत्या विसर्जन हौदासाठी महापालिका खर्च करणार सव्वा कोटी

: खर्च वाढता वाढे

: स्थायी समिती समोर प्रस्ताव

पुणे: आगामी दोन दिवसांवर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे. दरवर्षी प्रमाणे महापालिका त्या तयारीत आहे. मात्र या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. या वर्षी देखील महापालिका शहरात विसर्जन हौद आणि गणेश मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून देणार आहे. मात्र यासाठी महापालिकेचा खर्च वाढताना दिसून येत आहे. या हौद आणि संकलन केंद्रासाठी महापालिका 1 कोटी 26 लाख रुपये खर्च करणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थयी समिती समोर ठेवण्यात आला आहे. यावर आगामी बैठकीत चर्चा होईल.

: उत्सवावर कोरोनाचे सावट

पुणे शहरामध्ये माहे मार्च २०२० पासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या नियंत्रित करणे करिता social distancing पालन करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने दर वर्षी होणारा गणेशोत्सव वर सन २०२० पासून कोविड १९ च्या प्रादुर्भाव मुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. सन २०२० पूर्वी दर वर्षी गणेशोत्सव झाल्यावर गणेश मुत्यांचे विसर्जन नदीपात्रात न करता त्यासाठी हौद व टाक्यांची व्यवस्था पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येते. सदर ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. परंतु, कोविड- १९ च्या सार्वभूमीवर social distancing चे पालन करण्याच्या हेतूने सन २०२० मध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जनसाठी पारंपारिक हौद व टाक्यांची व्यवस्था करणे शक्य झाले नाही. गणेशोत्सवासाठी महापौर यांच्या महापौर विकास निधीतून मूर्ती विसर्जनाकरिता महाराष्ट्र  अधिनियम १९४९ चे कलम ६७ (३) (क) अंतर्गत तातडीने पुणे शहरामध्ये फिरते विसर्जन हीद कार्यान्वित करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन फिरते हौद या प्रमाणे एकूण ३० फिरते हौदांचे नियोजन करण्यात आले होते. या वर्षी देखील  गणेशोत्सवासाठी कोबिड-१९ च्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पद्धतीने विसर्जन करणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर
गणेश उत्सव  २०२१ साठी वाहनावरील फिरते विसर्जन हौद कार्यान्वित करणे याकरिता दरपत्रक मागविणे व अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबविली गेली होती. त्या अनुषंगाने पुणे मनपा हद्दीतील गणेशोत्सब २०२१ साठी भाडेतत्वाने वाहनावरील फिरते विसर्जन हौद पुरविणे व पावित्र्य राखून गणेश मूर्ती संकलन करण्याच्या कामा करिता एकूण सहा ठेकेदारांची निविदा प्राप्त झाली होती. त्यानुसार सिद्धी ऍडवटायजिंग ला हे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 26 लाखाचा खर्च होईल. मात्र महापालिका एकीकडे लोकांना घरीच विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट देते. असे असताना ही आता हौदावर एवढा खर्च करणे मनपास परवडणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोविड च्या कारणास्तव गर्दी टाळण्यासाठी आणि लोकांच्या मागणीनुसार आपण फिरते विसर्जन हौद बनवतो आहोत. मागील वर्षी पेक्षा दुपटीने हौद वाढवले आहेत. त्यामुळे खर्च वाढतो आहे. मात्र हा उपक्रम लोकांच्या सोयीसाठी राबवला जात आहे. एवढाच महत्वाचा हेतू आहे.

           मुरलीधर मोहोळ, महापौर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0