खडकवासल्यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु: टप्प्याटप्प्याने 1150 क्युसेक विसर्ग करणार: जलसंपदा विभागाची माहिती

Homeपुणे

खडकवासल्यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु: टप्प्याटप्प्याने 1150 क्युसेक विसर्ग करणार: जलसंपदा विभागाची माहिती

Ganesh Kumar Mule Sep 10, 2021 10:05 AM

Pune Shivsena UBT | पुणे विधानसभेची जबाबदारी चार निष्ठावंत माजी नगरसेवकांकडे
NCP Pune Resigns Marathi news | अखेर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे 
Koos | सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

खडकवासला धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

: टप्प्याटप्प्याने वाढवत 1150 क्युसेक करणार

: जलसंपदा विभागाची माहिती

पुणे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. धरण साखळी तील सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आज सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दुपारी 2 वाजल्यापासून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

: दोन दिवसांपासून जोरदार पाऊस

खडकवासला साखळी क्षेत्रातील प्रमुख चार धरणांमधून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडल्याने ही धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच खडकवासला धरण सर्वात छोटे असल्याने ते लवकर भरते. धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी हा विसर्ग 200 क्युसेक होता. तो वाढवून आता 500 क्युसेक करण्यात आला आहे. संध्याकाळी विसर्ग वाढवत 1150 क्युसेक करण्यात येणार आहे.

दरम्यान खडकवासला, पानशेत, टेमघर व वरसगाव अशा 4 धरणात मिळून 27.95 टीएमसी पाणी जमा झाले आहे. हे पाणी 95.90% इतके आहे. जे शहराची आगामी वर्षभराची तहान भागवू शकते. मागील वर्षी याच दिवशी धरणे 98% भरली होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0