न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत   : स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास आदेश   : विसर्जन हौदाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

HomeपुणेPMC

न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत : स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास आदेश : विसर्जन हौदाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

Ganesh Kumar Mule Sep 15, 2021 3:26 AM

Palkhi Sohala 2023 Update| पालखी सोहळ्यात केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाची माहिती 
Constitution Day of India | संविधान दिनानिमित्त प्रभागात 50 जणांना सायकल वाटप | डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा उपक्रम
PMC Solid Waste Management | पालखी मुक्कामी असताना आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरही वारकऱ्यांनी आणि पुणेकरांनी अनुभवली स्वच्छता | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या व्यवस्थापनामुळे शहर राहिले चकाचक  

न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाहीत

: स्थायी समिती अध्यक्षांचे प्रशासनास आदेश

: विसर्जन हौदाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा

पुणे: गणेश उत्सव काळात या वर्षी देखील महापालिका शहरात विसर्जन हौद आणि गणेश मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध करून दिले आहेत. मात्र याचा नागरिकांना उपयोग होण्याऐवजी मनस्ताप सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. कहर म्हणजे  यासाठी महापालिकेचा खर्च वाढताना दिसून येत आहे. या हौद आणि संकलन केंद्रासाठी महापालिका 1 कोटी 26 लाख रुपये खर्च करणार आहे. मागील वर्षीचा अनुभव पाहता महापालिकेने यंदा 60 हौद तयार केले आहेत. तरीही नागरिक परेशान झाले. कारण मनपा प्रशासनाचे नियोजनच नाही झाले. मग करोडो खर्च करून काय उपयोग झाला, असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावर मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रशासनाला आदेश दिले न झालेल्या कामाचे पैसे ठेकेदाराला देऊ नका.

: हौद करूनही नागरिकांची गैरसोय

पुणे शहरामध्ये माहे मार्च २०२० पासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या नियंत्रित करणे करिता social distancing पालन करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने दर वर्षी होणारा गणेशोत्सव वर सन २०२० पासून कोविड १९ च्या प्रादुर्भाव मुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. सन २०२० पूर्वी दर वर्षी गणेशोत्सव झाल्यावर गणेश मुत्यांचे विसर्जन नदीपात्रात न करता त्यासाठी हौद व टाक्यांची व्यवस्था पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात येते. सदर ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. परंतु, कोविड- १९ च्या सार्वभूमीवर social distancing चे पालन करण्याच्या हेतूने सन २०२० मध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जनसाठी पारंपारिक हौद व टाक्यांची व्यवस्था करणे शक्य झाले नाही. गणेशोत्सवासाठी महापौर यांच्या महापौर विकास निधीतून मूर्ती विसर्जनाकरिता महाराष्ट्र  अधिनियम १९४९ चे कलम ६७ (३) (क) अंतर्गत तातडीने पुणे शहरामध्ये फिरते विसर्जन हीद कार्यान्वित करण्यात आले होते. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन फिरते हौद या प्रमाणे एकूण ३० फिरते हौदांचे नियोजन करण्यात आले होते. या वर्षी देखील  गणेशोत्सवासाठी कोबिड-१९ च्या पार्श्वभूमीवर पारंपारिक पद्धतीने विसर्जन करणे शक्य होणार नाही. या पार्श्वभूमीवर
गणेश उत्सव  २०२१ साठी वाहनावरील फिरते विसर्जन हौद कार्यान्वित करणे याकरिता दरपत्रक मागविणे व अल्प मुदतीची निविदा प्रक्रिया राबविली गेली होती. त्या अनुशंगाने पुणे मनपा हद्दीतील गणेशोत्सब २०२१ साठी भाडेतत्वाने वाहनावरील फिरते विसर्जन हौद पुरविणे व पावित्र्य राखून गणेश मूर्ती संकलन करण्याच्या कामा करिता एकूण सहा ठेकेदारांची निविदा प्राप्त झाली होती. त्यानुसार सिद्धी ऍडवटायजिंग ला हे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 26 लाखाचा खर्च होईल. यासाठी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

: प्रशासन अंमलबजावणी करणार का याकडे लक्ष

 मात्र महापालिका एकीकडे लोकांना घरीच विसर्जन करण्यासाठी अमोनियम बायकार्बोनेट देते. असे असताना ही आता हौदावर एवढा खर्च करणे मनपास परवडणार आहे का, असा प्रश्न ‘कारभारी’ ने उपस्थित केला होता. शिवाय गर्दी होऊ नये म्हणून हौद केले, असे सांगितले जाते. मात्र आज गेल्या वर्षी सारखी परिस्थिती नाही. 35 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लोकडाऊन मध्ये शिथिलता दिली आहे. असे असताना ही हौद वाढवले. यावर महापौरांनी सांगितले होते कि नागरिकांच्या सोयीसाठी हे आपण करत आहोत. प्रत्यक्षात मात्र दिड दिवसाचा गणपती विसर्जन करताना मात्र नागरिकाना त्रासच सहन करावा लागला. त्यामुळे एवढे करोडो खर्च करून काय उपयोग झाला, असा प्रश्न नागरिक, सामाजिक संस्था व राजकारणी विचारत होते. यावर मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी प्रशासनाला आदेश दिले न झालेल्या कामाचे पैसे ठेकेदाराला देऊ नका. मात्र प्रशासन यावर अमलबजावणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विसर्जन हौदाच्या विषयात न झालेल्या कामाचे पैसे दिले जाणार नाही. महापालिका प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत.

         हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती.