एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली   : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा   : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

Homeमहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली : कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

Ganesh Kumar Mule Sep 03, 2021 3:23 AM

TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 
Vasant More : MNS : पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?  : वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार  
Marathi Language in Administration | मायमराठी व्हावी लोक प्रशासनाची भाषा | ‘प्रशासनातील मराठी भाषा’ परिसंवादात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली

: कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा

: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले निर्देश

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी गुरुवारी दिले. त्यानुसार, तत्काळ निधी वितरित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे.

या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी १४५० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला यापूर्वीच देण्यात आला आहे. उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यातून महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.