अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत

HomeपुणेPMC

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत

Ganesh Kumar Mule Aug 25, 2021 1:22 PM

Hadapsar – Mundhwa Ward office | पाण्याचा अपव्यय केल्याबद्दल तुकाई दर्शन, फुरसुंगी परिसरातील नागरिकांना महापालिकेकडून नोटीसा! | नागरिकांनी नोटिसांचा केला निषेध
PMC Water Supply Department | खैरेवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला | पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली व्यवस्था 
Dr Ramesh Shelar PMC | मुख्य अभियंता (विद्युत) पद भरताना अनियमितता झाली असल्याचा डॉ रमेश शेलार यांचा आरोप | आस्थापना विभागाची चौकशी करण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

अॅमिनिटी स्पेस बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव पुणेकर कदापि सहन करणार नाहीत

– काँग्रेस गटनेता आबा बागुल यांचा इशारा
पुणे. पुणे शहरातील अॅमिनिटी स्पेस खाजगी वापरासाठी ३० ते ९० वर्ष इतक्या दीर्घ मुदतीच्या काळासाठी भाडयाने देण्याचा म्हणजेच विक्री करण्याचा भाजपने रचलेला डाव हा पुणेकरांच्या हिताविरूध्द आहे. हा डाव पुणेकर सहन करणार नाहीत, असा इशारा काँग्रेस गटनेता आबा बागुल यांनी सत्ताधारी भाजपाला दिला आहे.
बागुल म्हणाले, पुणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढीचे गोंडस नाव देऊन हा विषय मान्यतेसाठी सादर केला आहे. अमिनिटी  स्पेस या नागरिकांसाठी असून त्याचा वापर व्यावसायिक कारणासाठी होता कामा नये. नागरिकासाठी मोफत वापरास ठेवणे अपेक्षित आहे. अमिनिटी  स्पेसच्या जागांचा वापर करावयाचा झाल्यास पुणे मनपा व विविध संस्थेमार्फत संयुक्त प्रकल्प देखील करता येईल व संयुक्त प्रकल्प करताना ५० टक्के वापर मोफत व ५० टक्के वापर व्यावसायिक केले तर सर्वसामान्य नागरिकांना (उदा.शाळा, हॉस्पिटल, क्रीडासंकुल) याचा लाभ मिळेल. महानगरपालिकेचे अनेक संयुक्त प्रकल्प असून त्या धोरणाप्रमाणे देखील कार्यवाही होऊ शकते. सदर अॅ मिनिटी स्पेस वरील एफ.एस.आय वापरला असून त्यापोटी सदर अॅरमिनिटी स्पेस ताब्यात आल्याने हि जागा नोन बिल्ट उप झाली असल्याने कोणत्या कायद्याने पुन्हा यावर बांधकाम करता येईल हा कायदेशीर प्रश्न आहेच. काही संस्था याविषयी न्यायालयात गेले आहेत याचाही विचार होणे आवश्यक आहे. सदर अॅामिनिटी स्पेसवर कडुलिंब, वड, पिंपळ अशी झाडे लावल्यास हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढणार असून ऑक्सिजनचे महत्व कोरोना काळात अधोरेखित झालेले आहे. तसेच रस्त्यावरील अमर्याद पार्किंग वाढत असून रस्ते हे पार्किंगसाठी नाहीत असे उच्च न्यायालयाने देखील फटकारले असून नागरिकांच्या पार्किंगच्या सोयीसाठी सदर अॅामिनिटी स्पेसवर पार्किंग देखील करता येईल व यामधूनही मनपास उत्पन्न मिळेल. सोसायटी मध्ये नागरिक घर घेताना त्याठिकाणी जवळच अॅकमिनिटी स्पेस असून यावरील अॅसमिनिटीचा लाभ मिळेल या हेतूने तो घर खरेदी करतो, सबब अॅामिनिटी स्पेसला लागून असलेल्या सोसायटी मधील नागरिकांना यावरील वापर हे मोफत मिळाले पाहिजेत. काही मुठभर धनदांडग्यांच्या हितासाठी पुणेकरांना वेठीस धरू नका व ८००० कोटीचे बजेट सादर करणाऱ्या महापालिकेचे उत्पन्न वाढीचे गोंडस करण दर्शवित अॅ मिनिटी स्पेस विकू नका, या अॅपमिनिटी स्पेस अनेक वर्षांपासून मनपाच्या ताब्यात आहेत त्या कोणाच्याही घशात घालू नका अशी मागणी आबा बागुल  यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1