MHADA | Pune | पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

HomeBreaking Newsपुणे

MHADA | Pune | पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

Ganesh Kumar Mule Jan 05, 2023 1:14 PM

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत
Katraj Dairy Pune | Play Ground Reservation | कात्रज येथील मैदानाचे आरक्षण उठवू नये या मागणीसाठी महाविकास आघाडीचे वतीने पुणे महानगरपालिकेसमोर आंदोलन
Pune Catonment Assembly Constituency | प्रभाग 20 मध्ये महायुतीचे सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आजपासून करू शकता अर्ज

| 5 हजार 915 सदनिकांची लॉटरी

म्हाडाने (MHADA Pune) विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील 5 हजार 915 सदनिकांची सोडत (Lottery) जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना गुरुवार दि.5 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर घरांची सोडत दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली. (Pune MHADA Lottery)

म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर 4 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या विविध योजनेतील 2 हजार 594 सदनिका , 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 2 हजार 990 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 396 सदनिका असे एकूण 5 हजार 915 सदनिकांसाठी सोडत होणार आहे. तर यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत 2 हजार 925 घरे उपलब्ध आहेत, अशी माहिती माने पाटील यांनी दिली.

सोडतीचे वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात – दि. 5 जानेवारी
ऑनलाइन पेमेंट स्वीकृती सुरुवात – दि. 7 जानेवारी
ऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुद्‌त – दि. 4 फेब्रुवारी
सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास अंतिम मुदत – दि. 5 फेब्रुवारी
ऑनलाईन पेमेंट,अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुदत – दि. 6 फेब्रुवारी
सोडतीसाठी अंतिम अर्जांची यादी प्रसिद्ध – दि. 15 फेब्रुवारी
सोडत – दि.17 फेब्रुवारी