Yoga Day | योग शिबिरात गुलशे तालमीचा सक्रिय सहभाग!
Gulashe Talim – (The Karbhari News Service) – केंद्रीय आयुष मंत्रालय व सहकार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त 21 जून 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील तरुण पिढी करता भव्य योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. (Pune News)
योग शिबिरा करता सकाळी सहा वाजता पुण्यातील हजारो युवकांसह नागरिकांनी पंडित फार्म कोथरूड येथे गर्दी केली होती. गुलाशे तालमीचे वस्ताद पैलवान भूषण दादा विजयराव जाधव यांच्या समवेत सुमारे 110 युवा पैलवानानी देखील गुलशे तालीम ते कोथरूड धावण्याचा सराव करणे. सोबतच सदर शिबिराचा योग करून लाभ घेतला.

COMMENTS