यवतमालच्या वेदांतची सुवर्ण पदकला गवसणी
पुणे: चंदिगड येथे आयोजित सब जूनियर (१२ ते १५ ) गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळवून घवघवीत यश संपादन केले. यवतमालच्या वेदांतने ३० किलोखलील गटात उत्कृष्ट खेळ करीत पंजाब, दिल्लीच्या खेळाडूंना सहज पराभूत करीत सुवर्ण पदक पटकावले.
ज्युदो फेडरेशनच ऑफ इंडियाचे अधक्ष्य प्रतापसिंह बाजवा यांनी वेदांतच्या खेळाचे विशेष कौतुक केले. विशेष कौतुकाची बाब म्हणजे त्रिब्यकेश्वर येथील आदिवासी विकास केंद्राची खेळाडू वैभवी आहेर हिने २८ किलो खलील गटात सहभागी होत रौप्य पदक प्राप्त केले. नासिकचे जेष्ठ राष्ट्रीय खेळाडू आनंद अभ्यंकर गेली २ वर्ष या आश्रमातील मुलांना मोफत प्रशिक्षण देत आहेत. अत्यंत गरीब घरातून आलेल्या या मुलीने पहिल्याच प्रयत्नात मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याव्यतिरिक्त मुलींच्या गटात कोल्हापूरच्या समीक्षा सदावर्ते हिने ५७ किलोखालील गटात रौप्य तर ठाण्याच्या भक्ति भोसले हिने ४४ किलोखालील गटात कास्य पदक पटकावले.
कोल्हापूरच्या पृथ्वीराज शेलार याने ५० किलोखालील गटात रौप्य पदक पटकावित कोल्हापूरला दुसरे पदक मिळवून दिले. तर लातूरच्या रुद्रेश तंबोरकर याने ४० किलोखालील गटात कास्य पदक पटकावित लातूरला ज्युदोमधील पहिले राष्ट्रीय पदक मिळवून दिले. विजयी खेळाडुंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे जनरल सेक्रेटरी शैलेश टिळक आणि अध्यक्ष धनंजय भोंसले यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS