Women Security | निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळाच्या वतीने महिला सुरक्षा बाबत जनजागृती

Homeadministrative

Women Security | निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळाच्या वतीने महिला सुरक्षा बाबत जनजागृती

Ganesh Kumar Mule Oct 15, 2024 11:06 PM

Assistant Encroachment Inspectors | पुणे महापालिकेकडून भरती केलेल्या ९७ सहायक अतिक्रमण निरीक्षकांच्या नेमणुका
Independence Day | पुणे महानगरपालिकेत भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Assistant Commissioner | PMC | सहायक आयुक्त पदाच्या नेमणुकीच्या पद्धतीत बदल | वर्ग 3 मधील कर्मचारी देखील परीक्षेद्वारे होणार सहायक आयुक्त

Women Security | निरामय संस्था आणि एकता मित्र मंडळाच्या वतीने महिला सुरक्षा बाबत जनजागृती

 

Pune News – (The Karbhari News Service) – नवरात्रीच्या निमित्ताने निरामय संस्था, पुणे व एकता मित्र मंडळ, अरण्येश्वर यांच्या माध्यमातून समाजातील रणरागिणी असणाऱ्या पर्वती पोलीस स्टेशन दामिनी पथकाचे ‘सुरक्षा’ विषयात महत्त्वपूर्ण जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी निरामय संस्था, पुणे यांच्या पुढाकारातून व एकता मित्र मंडळ, अरण्येश्वर यांच्या माध्यमातून महिला सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आली. सध्या सभोवतालच्या घडामोडीमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कोणत्याही भूलथापांवर विश्वास न ठेवण्याची समज मुलींना यावी यासाठी या मुलींना तसेच महिलांना योग्य ते मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे, हा उद्देश ठरवून नवरात्रीच्या निमित्ताने मुलींना सुरक्षा या विषयांतर्गत माहिती देण्यासाठी पर्वती पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकाच्या महिला सुरक्षा पथकातील अधिकारी रजिया सय्यद आणि पर्वती पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल आरती शेजवळ यांनी स्व: सुरक्षा यासोबत इतरांची सुरक्षा विषयी मुलींना अत्यंत महत्त्वपूर्ण विषय व मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

यावेळी किशोरी शक्ती वर्गातील मुलींनी आई जगदंबेच्या गा सुंदर नृत्य सादर केले. दामिनी पथकातील अधिकारी रजिया सय्यद मॅडम यांनी दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या घडामोडी, वाईट आणि अडचणीच्या वेळेप्रसंगी प्रसंगावधान राखून स्वतः ची सुरक्षा करण्यासाठी कशी करावी, वाईट प्रवृत्तींना कसा आळा घालणे, गुड टच बॅड टच (Good Touch & Bad Touch), मुलांसोबत कायम संवाद ठेवणे गरजेचे आहे, मुलांच्या वागणुकीत आणि विचारांमध्ये होणारे बदल वेळेवरती ओळखावेत, लहान वयातच मुलांच्या हातात मोबाईल फोन देणे किती घातक ठरू शकते अशा अनेक विषयांवर उदाहरणांसहित प्रात्यक्षिके दाखवून सकारात्मक विचार रुजविले.

पोलीस रजिया सय्यद मॅडम व आरती शेजवळ मॅडम यांचा मंडळातर्फे यथोचित सन्मान व सत्कार करून त्यांच्या शुभहस्ते वर्गातील सर्व लहान मुलांना वह्यांचे वाटप करून श्रींची आरती करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर मुलींचा भोंडल्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

*दामिनी पथक कार्य -*
समाजामध्ये अनेक अशा तक्रारी असतात ज्या पोलिसांपर्यंत न जाता अनेक महिला वरती अन्याय होतो. त्या महिलांच्या मदतीला कोणी येत नाही. पुणे पोलिसांच्या दामिनी पथक मात्र पुण्यातील महिलाच्या संरक्षणासाठी आणि तक्रार निवारणासाठी सदा सक्षम ( Damini Squad for Women Protection ) असतं. त्यासाठीच्या दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पुणे पोलीस अंतर्गत असलेले हे दामिनी पथक हे शाळा कॉलेज, विविध धार्मिक उत्सव यामध्ये सुद्धा पेट्रोलिंग करत असते. यामध्ये काही तक्रारी घटना गुन्हे घडत असतील तर त्याचे निवारण करण्याचे काम या सगळ्या महिला दुर्गा करतात ज्या दामिनी पथक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0