बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजितदादा यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणे टाळले. अजित पवार यांच्या ताफ्यामधील दोन वाहन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पवार कुटुंबाकडून दिवाळी निमित्त होणाऱ्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबीय हे दरवर्षी दिवाळी पाडव्या दिवशी बारामती येथील निवास्थानी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
COMMENTS
भारताचे शेजारी देश असलेल्या आणि पुर्वी भारताचाच भाग असलेल्या पाकिस्तान ममधे पेट्रोल डीजल चे दौरे ₹60 पेक्षा निम्याने कमी आहेत असे असताना भारतासारख्या देशांमध्ये जनतेला दोन्ही तिने सर्व सरकार ट्रोल डिझेल वोर्तिसेस वखारी कर लावून गुप्ता आहेत ही अत्यंत निंदनीय बाब आहे याबाबत पक्षाने विरोधी पक्षनेते किंवा राज्यातील नेते किंवा आणि कोण नेते असतील ते बोलत का नाही त्यांची त्यावर ती चुकली काय जर पाकिस्तानमध्ये 48 ते 60 रुपयाच्या आसपास पेट्रोल डिझेलचे दर असतील त्यांनी तिथं नागरिकांना कोणत्याही प्रकारचा कर लागत नसेल तर भारतामध्ये आहे का असा प्रश्न यावेळी देखील शेतकरी संघटनेने राज्य आणि केंद्र सरकारला विचारला त्यानंतर हे पेट्रोलचे दर कमी झालेली आहे ते कुणाचे आंदोलन नाहीत केवळ शेतकरी संघटनेच्या निवेदन आणि बातम्यांवर ती हे दर कमी झालेले आहेत याबाबत मीडियाने लक्ष वेधले पाहिजे शेतकरी संघटनेचं काम सर्वश्रेष्ठ आहे. संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया ने जावंधिया यांनी यापूर्वी लेखी स्वरूपामध्ये आणि अर्थपूर्ण स्टेटमेंट मीडियाला केलेला आहे त्या संदर्भामध्ये मिडीयानी वापर करावा असं मत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून विठ्ठल पवार राजे यांनी, द कारभारी न्यूज सीट बोलताना आपले मत व्यक्त केले