MLA Chetan Tupe | पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी? | आमदार चेतन  तुपे यांनी  सरकारला धरले धारेवर

HomeपुणेBreaking News

MLA Chetan Tupe | पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी? | आमदार चेतन तुपे यांनी सरकारला धरले धारेवर

Ganesh Kumar Mule Mar 27, 2023 3:06 AM

Panshet Flood Victims |भाजपकडून पानशेत पुरग्रस्तांवर नऊ वर्षांपासून अन्यायच ; निवडणुकीच्या भितीपोटी काढला आदेश | मोहन जोशी
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप!
kasbapeth Bypoll | कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर 

पुणे मनपा तील भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई कधी?

| आमदार चेतन  तुपे यांनी  सरकारला धरले धारेवर

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे (Hadapsar constituency) आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील (MLA Chetan Tupe) यांनी विधानसभेत (Vidhansabha) बोलताना पुणे मनपा(PMC Pune) मधील मागील पाच वर्षातील भ्रष्टाचाराचा (corruption) मुद्दा ऐरणीवर आणला. यात एकेकाळी पुण्यातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका करणारे मंत्री उदय सामंत यांना आता या भ्रष्टाचाऱ्यांना शासन करणार का अशी थेट विचारणा केली.
सभागृहात मुंबई मनपा बाबत बरीच चर्चा आहे. २५ वर्षांपासून एकदिलाने सत्ता करणारे आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. मुंबईतला भ्रष्टाचार सगळ्यांना दिसतो आहे पण पुणे मनपा मधल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कारवाई करण्याची, त्याविरुद्ध बोलण्याची हिंमत हे शिंदे फडणवीस सरकार करणार का? अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.
२०१७ ते २०२२ पर्यंत पुणे मनपा मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यावर कारवाई हे सरकार करणार का? आत्ताच्या सरकारमध्ये मंत्री असलेले  मा.उदय सामंत साहेब यांनी पुणे मनपा मध्ये मी विरोधी पक्षनेता असताना शिवसेना संपर्कप्रमुख म्हणून पुणे मनपा मध्ये येऊन सत्ताधारी भाजपच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली होती. याचा मी साक्षीदार आहे असे आ.तुपे यांनी सांगितले.
ज्या तडफेने मंत्री महोदयांनी पुणे मनपा मधल्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका केली, ताशेरे ओढले तेच लक्षात ठेवून आज ते भ्रष्टाचारी व्यक्तींविरोधात कारवाई करणार का, चौकशी करणार का असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचे सांगून ज्यांनी जनतेचा पैसा लुटला, पुणे मनपाची तिजोरी लुटली त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करणार का? भ्रष्टाचाऱ्यांची गय केली जाणार नाही असे शिंदे फडणवीस सरकारने सांगितले आहे तोच न्याय पुणे मनपाला लावणार का? हा थेट सवाल केला.