PMC Ward 18 – Vanavadi Salunkhe Vihar | प्रभाग क्रमांक – १८ वानवडी साळुंखे विहार | सोपानबाग परिसर ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन पर्यंत व्याप्ती असलेल्या या  प्रभागाची रचना जाणून घ्या

Homeadministrative

PMC Ward 18 – Vanavadi Salunkhe Vihar | प्रभाग क्रमांक – १८ वानवडी साळुंखे विहार | सोपानबाग परिसर ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन पर्यंत व्याप्ती असलेल्या या  प्रभागाची रचना जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Sep 03, 2025 9:06 AM

New Wage Code | नवीन कामगार संहिता, वेतन डीकोड केलेले – मसुदा तयार | कधीही लागू होऊ शकतो | संपूर्ण अहवाल वाचा
Prashant Jagtap Vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी घरी दोन घास सुखाने खावे आणि मानसिक उपचार करून आराम करावे | प्रशांत जगताप 
MP Supriya Sule | अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी |खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी | नवले पूल परिसरात पुन्हा मोठा अपघात

PMC Ward 18 – Vanavadi Salunkhe Vihar | प्रभाग क्रमांक – १८ वानवडी साळुंखे विहार | सोपानबाग परिसर ते महात्मा फुले सांस्कृतिक भवन पर्यंत व्याप्ती असलेल्या या  प्रभागाची रचना जाणून घ्या

 

Pune Corporation Election – 2025 – (The Karbhari News Service) – रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय, शिवरकर उद्यान. म. फुले सांस्कृतीक भवन इ. असे विविध परिसर प्रभाग क्रमांक – १८ वानवडी साळुंखे विहार मध्ये मोडतात. आज आपण या प्रभागाची व्पाप्ती आणि रचना जाणून घेऊयात. (Pune Municipal Corpoation (PMC) Election 2025)

 

प्रभाग क्रमांक – १८ वानवडी साळुंखे विहार

लोकसंख्या- एकूण ८५८७२ -अ. जा. ७७५४ – अ. ज. ९१२

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या  – ४

व्याप्तीः सोपानबाग परिसर, उदय बाग परिसर, जांभूळकर मळा, स्वामी विवेकानंद नगर, सेंट पॅट्रिक टाऊन, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, परमार नगर फातिमा नगर (पार्ट) वानवडी गाव, एस.आर.पी.एफ. कॉलनी नं. १ व २ नानावटी नगर वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, नेताजी नगर, आझाद नगर, साळुंके विहार सोसायटी, ग्रॅफीकॉन पॅरेडाईज, कुबेरा गार्डन, सिद्धार्थ नगर, गंगा सॅटेलाईट, रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय, शिवरकर उद्यान. म. फुले सांस्कृतीक भवन इ.

उत्तर: पुणे कॅन्टोन्मेंटची मनपा हद्द (भैरोबा नाला) पुणे मिरज रेल्वे लाईनला जेथे मिळते तेथून दक्षिण पूर्वेस पुणे मिरज रेल्वे लाईनने जुना मुठा कालव्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस जुना मुठा कालव्याने बी.टी. कवडे रस्ता ओलांडून ब्रम्हाबाग सोसायटीच्या पूर्वेकडे अॅक्युरेट इंजिनीअरिंग कंपनी जवळ नवीन मुठा कालव्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस व पुढे दक्षिणेस नवीन मुठा कालव्याने इंटरवाल्व पूनावाला लि. या इमारतीजवळ जस्मिनियम सोसायटीमधील एम बिल्डींग पासून येणाऱ्या सरळरेषेस मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर सरळ रेषेने जुन्या मुठा कालव्या शेजारील रस्त्यास (जस्मिनियम सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्यास) मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने नवीन मेगासेंटर जवळ पुणे सोलापूर रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः जुना मुठा कालव्या शेजारील रस्ता (जस्मिनियम सोसायटीच्या पश्चिमेकडील रस्त्यास) नवीन मेगासेंटर जवळ पुणे सोलापूर रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस पुणे सोलापूर रस्त्याने पुणे मिरज रेल्वे लाईन ओलांडून AIPT च्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे दक्षिणेस मौजे हडपसर, मौजे वानवडी यांच्या हद्दीने व पुढे दक्षिणेस मौजे महंमदवाडी व मौजे वानवडी आणि मौजे कोंढवा खुर्द यांच्या हद्दीने ग्रॅफिकोन पॅरेडाइज व सिद्धार्थ नगरची दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

दक्षिण: मौजे महंमदवाडी व मौजे वानवडी आणि मौजे कोंढवा खुर्द यांची हद्द ग्रॅफिकोन पॅरेडाइज व सिद्धार्थ नगरची दक्षिणेकडील हद्दीस मिळते तेथून पश्चिमेस सदर हद्दीच्या सरळ रेषेने व पुढे पश्चिमेस ग्रॅफिकोन पॅरेडाइज व सिद्धार्थ नगरची दक्षिणेकडील हद्दीने रस्ता ओलांडून व पुढे सनसिटी बी बिल्डींग व सनश्री सुवर्णयुग इमारतीच्या उत्तरेकडील हद्दीने नारायण आण्णाजी शिंदे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने NIBM रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस NIBM रस्त्याने भैरोबा नाल्यास मिळेपर्यंत. तेथून उत्तरेस सदर नाल्याने व पुढे उत्तरेस कार-ओ- केअर या सर्व्हिस सेंटरच्या पूर्वेकडील रस्त्याने साळुंके विहार रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस साळुंके विहार रस्त्याने पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीस मिळेपर्यंत. (नेताजीनगर आणि बोराडेनगरची पश्चिमेकडील हद्द)

पश्चिमः साळुंके विहार रस्ता पुणे कॅन्टोन्मेंट च्या हद्दीस जेथे मिळतो, (नेताजीनगर आणि बोराडेनगरची पश्चिमेकडील हद्द) तेथून उत्तरेस पुणे कॅन्टोन्मेंटच्या मनपा हद्दीने व पुढे पुणे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीने पुणे सोलापूर रस्ता ओलांडून पुणे मिरज रेल्वे लाईनला मिळेपर्यंत.

 

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: