Wakeup Punekar Movement | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार  | वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश

Homeपुणेsocial

Wakeup Punekar Movement | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार | वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश

गणेश मुळे Feb 22, 2024 3:41 AM

Railway Ticket Booking | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल 
Ruby Hall to Ramwdi Pune Metro | रूबी हॉल ते रामवाडी मेट्रोचे अखेर होणार उद्घाटन | काँग्रेसच्या आंदोलनाला मिळाले यश – माजी आमदार मोहन जोशी
Pune Rain News | पूरग्रस्तांना ५हजाराची मदत नको भरीव रक्कम द्या; वाटप त्वरीत व्हावे | माजी आमदार मोहन जोशी

Wakeup Punekar Movement | कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

| वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश

| संयोजक, माजी आमदार मोहन जोशी

 

Wakeup Punekar Movement | पुणे : येथील साधू वासवानी पुलाच्या (Sadhu Waswani Bridge Pune)  पाडकामासाठी होणाऱ्या वाहतूक बदलात वाहनचालकांची सोय पाहिली जाईल आणि कोरेगांव पार्क, बंडगार्डन परिसरातील वाहतूक कोंडी सुटेल असा विश्वासवेकअप पुणेकर अभियानाचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी आज मंगळवारी व्यक्त केला .

वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क-बंडगार्डन भागात प्रायोगिक तत्त्वावर काही वाहतुकीचे बदल केले. मात्र याबदलांमुळे वाहतूक कोंडी होत होती. एकेरी वाहतुकीने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करायला लागत होता. नागरिकांच्या सूचनांची दखल घेतली जात नव्हती. याकरिता वेकअप पुणेकरच्या सदस्यांनी लक्ष घातले आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन वरील समस्यांची त्यांना कल्पना दिली.

तसेच मंगळवारी कोरेगाव पार्क-बंड गार्डन मधील नागरिक व रस्ते वाहतूक नियोजन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेरे , स्थानिक रहिवासी यांच्यासमवेत पहाणी केली चर्चा केली.नागरिकांनी मांडलेल्या सूचना ऐकून घेऊन शेरे यांनी त्या अनुषंगाने व एकूणच या भागातून होत असलेल्या वाहतुकीचा विचार करून नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन प्रस्तावित बदलांची माहिती नागरिकांना दिली. बदल देखील ट्रायल बेसिसवर करण्यात येऊन ते प्रभावी ठरल्यास कायम करण्यात येतील, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेरे यांनी स्पष्ट केले,अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. येथील वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.वेकअप पुणेकर अभियानाला पहिले यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

स्थानिक रहिवाशां तर्फे मोहल्ला कमिटी सदस्य धैर्यशील वंडेकर यांनी मोहन जोशी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेरे यांचे नागरिकां तर्फे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी पुणेकरांच्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मोहन जोशी यांनी घेतलेला पुढाकार ,चालवीत असलेले ‘वेक-अप पुणेकर’ अभियाना बद्दल धन्यवाद दिले. या अभियानाची माहिती घेऊन आपल्या भागातील वाहतूक सुरक्षित व व्यवस्थित होण्यासाठी सहभाग होण्याची तयारी दाखवली.

या वेळी जावेद मुनसिफ, अनिता ताहीर, रोहन देसाई, शेहनाज, कॅ. मिश्रा, मनोज फुलपगार, रीना करूलकर, पोलीस उपनिरिक्षक जाधव,रोहन सुरवसे,चेतन आगरवाल व इतर नागरिक उपस्थित होते.