उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनपा कर्मचाऱ्यांना दिले वेतन | कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण
| मात्र पहिल्या हफ्त्याची वाट अजून दूरच
पुणे | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळण्यासाठी अजूनही वाटच पाहावी लागणार आहे. दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लहर आहे. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने वारंवार आवाज उठवला होता. वेतन आयोग लागू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या लवकर वेतन मिळाले आहे. यापुढे ही वेळेत वेतन व्हावे आणि पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, तंत्र शाळांकडील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच समान हत्यांपैकी पहिल्या हत्याची रक्कम अदा करणे बाबतची संगणक प्रणाली अद्ययावत करण्यात आलेली आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार लेखा व वित्त विभागाने परिपत्रक देखील जारी केले होते. 5 ऑगस्ट पर्यंत ही बिले तपासून घेण्याचे आदेश लेखा विभागाने सर्व विभागांना दिले होते. मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना अजूनही रक्कम मिळालेली नाही. संगणक विभाग कडील तांत्रिक चुकीमुळे हा उशीर होत आहे. असे सांगण्यात येत आहे. दरम्यान गौरी आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम देण्याची मागणी करण्यात येत होती. याच्या अगोदर तरी रक्कम मिळणार का, याकडे महापालिका कर्मचारी डोळे लावून बसले होते. मात्र कर्मचाऱ्यांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाची लहर आहे. यापुढे ही वेळेत वेतन व्हावे आणि पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.