Vive Velankar on Pune Property tax | मालमत्ताधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकत कराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट | विवेक वेलणकर 

Homeadministrative

 Vive Velankar on Pune Property tax | मालमत्ताधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकत कराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट | विवेक वेलणकर 

Ganesh Kumar Mule Apr 01, 2026 7:30 PM

PMC Sanas Ground | सणस मैदान ‘चालवण्याचा’ भार महापालिकेला पेलवेना | पहिल्यांदाच मैदान भाडेतत्वावर देण्याचा निर्णय
Lohgaon-Wagholi water project | लोहगावकरांचा पाणी प्रश्न अखेर सुटणार | 283 कोटींच्या पाणी योजनेला मंजुरी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती
PMC Election 2025 | सरकारच्या अधिसूचनेनुसार पुणे महानगरपालिकेने पुन्हा एकदा आरक्षण काढावे | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे  मागणी 

 Vive Velankar on Pune Property tax | मालमत्ताधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मिळकत कराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट | विवेक वेलणकर

 

PMC Property Tax – (The Karbhari News Service) – मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेचं मालमत्ता कराचं उत्पन्न ११.३३ लाख करदात्यांना कडून २९८५ कोटी रुपये झाल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र या वर्षी राबवलेल्या अभय योजनेतून यातील ९५५ कोटी रुपये जमा झाले आहेत ( त्याकरीता महापालिकेला ८०० कोटी रुपयांचा दंड माफ करावा लागला आहे). अभय योजनेतून मिळालेला थकबाकीदारांचा मालमत्ता कर वगळला तर महापालिकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात फक्त २०३० कोटी रुपयांचं मालमत्ता कराचं उत्पन्न मिळालं आहे ते ही ११.३३ लाख मालमत्ता धारकांकडून. याउलट महापालिकेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २३४६ कोटी रुपयांचं मालमत्ता कराचं उत्पन्न मिळालं आहे ते ही १०.९५ लाख मालमत्ता धारकांकडून. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी मालमत्ताधारकांची संख्या ४० हजारांनी वाढूनही मालमत्ता कराच्या उत्पन्नात ३०० कोटींची घट झाली आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केला आहे. (Pune PMC News)

 

याबाबत वेलणकर यांनी महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार  २०२३-२४ या आर्थिक वर्षातही महापालिकेला २२५० कोटी रुपयांचं मालमत्ता कराचं उत्पन्न मिळालं होतं, म्हणजेच २०२३-२४ पेक्षाही यंदा २०० कोटींनी मालमत्ता कराचं उत्पन्न घटले आहे. याचं मुख्य कारण अर्थात अभय योजनेतून विनासायास उत्पन्न मिळेल या भरवशावर वसूलीचे जवळपास थांबवले गेलेले प्रयत्न हेच आहे. याशिवाय दर ३-४ वर्षांनी अभय योजना येतेच मग कशाला वेळच्या वेळी कर भरा अशी नागरीकांची वाढलेली मानसिकता हेही कारण असू शकते. या गोष्टींचा विचारही न करता २०२६-२७ मध्ये अर्थसंकल्पात मालमत्ता कराचं उत्पन्न ३८०० कोटी रुपये गृहीत धरले गेले आहे. हे उत्पन्न मिळवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील याचा अंदाज बांधून पहिल्या दिवसापासून सर्वंकष प्रयत्न करावे लागतील असे  विवेक वेलणकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: