Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

HomeपुणेBreaking News

Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Nov 04, 2022 2:09 PM

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्तांनी खातेप्रमुखांची घेतली ‘शाळा’! 
Registration of Births and Deaths (Amendment) Act, 2023 | जर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नसेल तर ते बनवा | हे प्रमाणपत्र 1 ऑक्टोबरपासून अनिवार्य होणार
TMV Pune | लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि ‘टिमवि’तर्फे ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा!

| वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी

| आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या 42 कोटींच्या कामांना महापालिकेच्या सिमेंट एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. 
         पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.  तसेच वडगाव शेरी मतदारसंघातील पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 42 कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.  त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
———————–
*वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी*
– विश्रांतवाडी – 509 चौक- विमानतळ  – 19 कोटी
– पुणे नगर रोड रिसर्फेसिंग –  15 कोटी
– बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी 7 कोटी 25 लाख.
– 509 चौक ते नागपूर चाळ –  1 कोटी