Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी 

HomeपुणेBreaking News

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी 

Ganesh Kumar Mule Oct 06, 2023 2:02 PM

Pune BJP : Jagdish Mulik : निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज
PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा 
Nagar Road Traffic | नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडवण्याची मागणी

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee | विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता | 62 कोटींचा निधी

Vishrantwadi Flyover | PMC Estimate Committee |विश्रांतवाडी येथे उड्डाणपूल व ग्रेड ग्रेड सेपरेटर निर्मितीसाठी पुणे महापालिकेच्या इस्तीमेट समितीने आज 62 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याचे बाब समोर आली होती. याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण व पुरेशी बस संख्या ठिkठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि रोड सेफ्टी ऑडिटमध्ये सुचविलेल्या उपाययोजना करण्याचे ठरविले होते. त्यानुसार येरवडा येथील गोलफ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. विश्रांतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलासाठी एस्टिमेट कमिटीने आज 62 कोटी रुपयांना मान्यता दिली. (Pune Municipal Corporation)


आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. ही कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपुल उभारण्यासाठी मी सातत्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महापालिकडे पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नाना यश आले असून महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीच्या बैठकीत विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाच्या ६२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. लवकरच या पुलाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी रस्ता, धानोरी रस्ता आणि विमानतळ रस्ता यासर्वाकंडे जाणाऱ्यांचा मार्ग निश्चितपणे सुकर होईल.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

———-

या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेतला. या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.

माजी आमदार जगदीश मुळीक


आंबेडकर चौक येथे मुख्यसभेत भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा दर्शनी भागांत पुर्णाकृती पुतळा बसवायचा ठराव पारित झालेला आहे. ते ही या ईस्टिमेट मधे असावे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे मनपा

———–