Vidhansabha Election Results | पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात ५०६ टेबलावर मतमोजणी

Homeadministrative

Vidhansabha Election Results | पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात ५०६ टेबलावर मतमोजणी

Ganesh Kumar Mule Nov 22, 2024 7:42 PM

Ganesh Utsav 2023 | Pune Metro Timetable | गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची  सेवा मध्यरात्री पर्यंत | जाणून घ्या वेळा 
Big decision of Pune Municipal Corporation! | 4% DA applicable to employees from July 1
Arvind Shinde | PMC Pune | पुणे महापालिकेतील बदली घोटाळा रोखा | अरविंद शिंदे यांची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

Vidhansabha Election Results | पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात ५०६ टेबलावर मतमोजणी

 

 Maharashtra Vidhansabha Election Results – (The Karbhari News Service) – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या (२३ नोव्हेंबर) होत असून २१ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय ईव्हीएम मतमोजणीसाठी ३९१ आणि टपाली तसेच ईटीपीबीएस मतमोजणीसह एकूण ५०६ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. (Pune News)

जिल्ह्यात मतमोजणीच्या सर्वाधिक ३० इतक्या फेऱ्या पुरंदर विधानसभा मतदार संघात होणार आहेत. तर बारामती मतदार संघात सर्वाधिक ३० टेबल ठेवण्यात येणार आहेत.

२१ मतदार संघात होणाऱ्या मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची माहिती पुढील प्रमाणे;

जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मिळून ईव्हीएम मतमोजणीसाठी ३९१, टपाली मतमोजणीसाठी ८७ तर ईटीपीबीएससाठी २८ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नर व आंबेगाव मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येकी १८ टेबल, टपाली मतपत्रिकांसाठी ६ तर ईटीपीबीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे १ व २ टेबल ठेवण्यात येणार असून २० फेऱ्या होणार आहेत.

खेड आळंदी- ईव्हीएम मतमोजणीसाठी २०, टपाली- ४, ईटीपीबीएस- २ टेबल- २० फेऱ्या, शिरुर- ईव्हीएम मतमोजणीसाठी २४, टपाली- ४, ईटीपीबीएस- २ टेबल- २४ फेऱ्या, दौंड- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ५, ईटीपीबीएस- १ टेबल- २३ फेऱ्या,

इंदापूर- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ६, ईटीपीबीएस- १ टेबल- २४ फेऱ्या अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

बारामती मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी २०, टपाली- ८, ईटीपीबीएस- २ टेबल- २० फेऱ्या, पुरंदर- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ६, ईटीपीबीएस- २ टेबल- ३० फेऱ्या,

भोर- ईव्हीएम मतमोजणीसाठी २४, टपाली- ३, ईटीपीबीएस- ३ टेबल- २४ फेऱ्या, मावळ- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- २, ईटीपीबीएस- १ टेबल- २९ फेऱ्या,

चिंचवड- ईव्हीएम मतमोजणीसाठी २४, टपाली- ४, ईटीपीबीएस- १ टेबल- २४ फेऱ्या, पिंपरी- ईव्हीएम मतमोजणीसाठी २०, टपाली- ३, ईटीपीबीएससाठी १ टेबल ठेवण्यात येणार असून २० फेऱ्या होणार आहेत.

भोसरी मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी २२, टपाली- ४, ईटीपीबीएस- १ टेबल- २३ फेऱ्या, वडगाव शेरी- ईव्हीएम मतमोजणीसाठी २०, टपाली- ३, ईटीपीबीएस – १ टेबल- २२ फेऱ्या, शिवाजीनगर- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ३, ईटीपीबीएस- १ टेबल- २० फेऱ्या,

कोथरुड- ईव्हीएम मतमोजणीसाठी २०, टपाली- ४, ईटीपीबीएस- १ टेबल- २० फेऱ्या, खडकवासला- ईव्हीएम मतमोजणीसाठी २१, टपाली- ४, ईटीपीबीएससाठी १ टेबल ठेवण्यात आले असून मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत.

पर्वती मतदार संघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १८, टपाली- २, ईटीपीबीएस- १ टेबल- २० फेऱ्या, हडपसर- ईव्हीएम मतमोजणीसाठी २४, टपाली- ४, ईटीपीबीएस- १ टेबल- २३ फेऱ्या, पुणे कॅन्टोन्मेंट- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ३, ईटीपीबीएस- १ टेबल- २० फेऱ्या.

कसबापेठ- ईव्हीएम मतमोजणीसाठी १४, टपाली- ३, ईटीपीबीएससाठी १ टेबल ठेवण्यात येणार असून २० फेऱ्या याप्रमाणे मतमोजणी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0