विडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही
:आमदार सुनील कांबळे यांचा खुलासा
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली दाखल
पुणे: भाजपचे पुणे कंटोन्मेंट मतदसरसंघाचे आमदार सुनील कांबळे यांची आज सकाळी एक विडिओ क्लिप वायरल झाली होती. ज्यात त्यांनी महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप होत होता. मात्र आता आमदार सुनील कांबळे यांनी खुलासा केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि हा माझा आवाज नाही. शिवाय त्यांनी याबाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करत बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
: बदनामी करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे : कांबळे
आपल्या तक्रारीत आमदार कांबळे यांनी म्हटले आहे की, मी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचा लोकनियुक्त आमदार असून गेली ३५ वर्ष सामाजिक कार्य करीत आहे. माझ्या ३५ वर्षाच्या राजकीय वाटचालीत देखील मी समाजातील महिलांचा मान सन्मान व जीवनमान उंचावण्या करता विविध उपक्रम राबवले आहेत. आज सकाळी माझ्या व्हॉट्सअॅपवर तसेच टीव्ही चॅनेल वरील बातम्या मधून मला समजले की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मी पुणे महानगर पालिकेच्या एका महिला अधिकाऱ्यांना फोनद्वारे शिवीगाळ केली असल्याची खोटी ऑडिओ क्लिप प्रसारित केली आहे. सदरची क्लिप मी सविस्तरपणे ऐकली असता त्यातील आवाज हा माझा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ऑडिओ क्लिप संपूर्णत: बनावट असून महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर माझी बदनामी करण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे. तरी आपणास विनंती की अशी बनावट व खोटी ऑडिओ क्लिप तयार करुन व प्रसारित करून माझी बदनामी करणाऱ्या विरुद्ध त्वरित कारवाई करावी. अशी मागणी आमदार कांबळे यांनी केली आहे.
COMMENTS