Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

HomeBreaking Newsपुणे

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

कारभारी वृत्तसेवा Dec 14, 2023 2:02 PM

23 Villeges Water Supply : समाविष्ट 23 गावांच्या पाण्याबाबत उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश 
Dilip Vede patil | दिलीप वेडेपाटील यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोपवली महत्वाची जबाबदारी! 
Dilip Vede Patil | मा.नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मागणीला हिरवा कंदील

Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे

Veer Savarkar | Dilip Vede Patil | स्वा.सावरकरांनी १३ डिसेंबर १९५३ रोजी पुण्याच्या रमणबाग (Ramanbaugh Pune) आवारात धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर या विषयावरच्या प्रसिद्ध व प्रभावी भाषणास ७० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन, बावधन आणि स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ डिसेंबर रोजी सायं. ६:०० वा अभिनेते शरद पोंक्षे यांचा “हिंदुहृदयसम्राट स्वा.सावरकरांचा द्रष्टेपणा” या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, स्वामी विवेकानंद ई लर्निंग स्कूल, एलएमडी चौक, बावधन खुर्द, पुणे २१ येथे आयोजित करण्यात आला होता. (Pune News)
 या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धीरज घाटे शहराध्यक्ष, पुणे – भारतीय जनता पार्टी, मा.डॉ.श्रद्धाताई प्रभुणे, नगरसेविका – पुणे मनपा,  मा.श्री. संजयजी चोरडिया, अध्यक्ष – सूर्यादत्ता एज्युकेशन फाऊंडेशन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाग संचालक मा.श्री.अनिलजी व्यास, मा.श्री.सहस्रबुद्धे तसेच स्वा.सावरकर प्रेमी मंडळ, पुणे यांचे पदाधिकारी व सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वक्ते आणि सावरकर प्रेमी श्री.शरद पोंक्षे यांनी त्यांच्या व्याख्यानात – सावरकरांचा द्रष्टेपणा या विषयाची मांडणी केली. या मध्ये अखंड हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेविषयीचा पुरोगामी दृष्टीकोन, अंदमान मध्ये स्वतंत्र भारताचे सामरिक युद्ध केंद्र उभारणी, जातिवाद निर्मुलनाबाबातचे त्यांचे अनेक प्रयत्न – पतितपावन मंदिराची उभारणी, सहभोजनाचे कार्यक्रम, दीनदलितांच्या मुंजी करून त्यांना वेदांचे अध्ययन – पठण करण्याचा अधिकार बहाल करणे. अश्या गोष्टी घडवून आणल्या त्याबाबतचे ज्वलंत अनुभव सांगितले. सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदू धर्म म्हणजे सर्व मानवजातीचा मनुष्य म्हणून स्वीकार करून प्रत्येकाशी माणुसकीने वागणे होय. देशाच्या सुरक्षा तुकडीत काम करणारा प्रत्येक जण हा आर्थिक दृष्ट्या सर्वांत सक्षम असला पाहिजे मग तो सैनिक असो वा पोलीस. एकूणच सावरकरांचे प्रत्येक बाबतीतले विचार हे अतिशय आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरून देशाची एकात्मता आणि एकसंधता टिकून राहून विकास साधणे असे आहेत. असे सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे असे विचार त्यांनी व्याख्यानातून मांडले.