Vaikunth Smashanbhumi | वैकुंठ स्मशानभूमी दशक्रिया विधी घाट येथे पत्रा शेड करा | माजी महापौरांचा आंदोलनाचा इशारा
Ankush Kakade – (The Karbhari News Service) – वैकुंठ स्मशानभूमी दशक्रिया विधी घाट येथे पत्रा शेड करा, अशी वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने लक्ष दिले नाही. असा आरोप माजी महापौर अंकुश काकडे यांनी केला आहे. तसेच आगामी दोन दिवसात शेड नाही केले तर आंदोलन करण्याचा इशारा काकडे यांनी दिला आहे. (Pune News)
याबाबत काकडे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार वैकुंठ स्मशानभूमी येथे दशक्रिया विधी होतात. त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये नागरिकांची अतिशय गैरसोय होते. त्या ठिकाणी पत्र्याची शेड करावी यासाठी मी वारंवार पाठपुरावा केला पण प्रशासनाकडून काहीही झाले नाही. आपणाला देखील 29 जुलै रोजी समक्ष निवेदन दिले आहे. त्या गोष्टीला आता जवळपास एक महिना होत आला आहे. परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. 2 दिवसांमध्ये जर शेड बांधणे हे काम झाले नाही, तर 25 ऑगस्ट रोजी सकाळी तेथील दशक्रिया होईपर्यंत पावसामध्ये मी त्या ठिकाणी बसून आंदोलन करणार आहे. असा इशारा काकडे यांनी दिला आहे.

COMMENTS