Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

HomeBreaking Newsपुणे

Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

Ganesh Kumar Mule Mar 27, 2023 1:34 PM

PMC Pune Shahari Garib Yojana | गरिबांनाच मिळतो आहे शहरी गरीब योजनेचा लाभ! | येरवडा परिसरातील गरिबांनी घेतला सगळ्यात जास्त लाभ
PMC Health Schemes | लाखोंचा मिळकत कर भरूनही शहरी गरीब योजनेचा फायदा लाटू पाहणाऱ्यांना पुणे मनपा आरोग्य विभागाने शिकवला धडा
Medical Insurance For PMC | अंशदायी वैद्यकीय योजना जाणार मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात! | महापालिका नेमणार ब्रोकर 

शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

| अजून एक खिडकी सुरु केली जाणार 

पुणे | शहरातील गरीब नागरिकांना आरोग्याची सुविधा मिळावी या हेतूने महापालिका (PMC Pune) आरोग्य विभागाने शहरी गरीब योजना (urban poor health scheme) सुरु केली आहे. तसेच महापालिकेत वारंवार चकरा माराव्या लागू नयेत म्हणून ही सुविधा ऑनलाईन (online) देखील करण्यात आली आहे. मात्र ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांना जास्त हेलपाटे मारावे लागत आहेत. याबाबतच्या तक्रारी पाहता महापालिका ही सुविधा ऑफलाईन (offline) देखील करणार आहे. यासाठी अजून एक खिडकी सुरु केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.  तसेच नागरिकांना ही योजना आणि त्यासाठी अर्ज करणे, आवश्यक कागदपत्रे याबाबतची माहिती देण्यासाठी फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Assistant Health Officer Dr Manisha Naik) यांनी दिली.
| ऑनलाईन योजनेबाबत नागरिकांच्या वाढल्या होत्या तक्रारी
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे मनपा कार्यक्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये राहात असलेल्या दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनिंगकार्ड व ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१ लाख पर्यंत असणाऱ्या कुटूंबीयांना लागू करण्यात आलेली आहे. सन २०२२-२३
या मध्ये एकुण १७३५५ नागरीकांना सभासदत्व कार्ड देण्यात आलेले असून एकुण १७५०५ नागरिकांनी लाभ
घेतलेला आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत नागरिकांना सभासदत्व देण्यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करुन पूर्णपणे कार्यान्वीत करणेत येत आहे व त्यानुसार नागरिकांचे सभासदत्व रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन प्रोसेस, प्री-अॅथोरायझेशन, बिलींग प्रोसेस याबाबत कार्यवाही करणेत येत आहे. नागरिकाना वारंवार महापालिकेत येण्याची आवश्यकता भासू नये म्हणून महापालिकेने ऑनलाईन ची सुविधा केली खरी, मात्र यामुळे जे नागरिक याबाबत user friendly नव्हते, त्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. कारण याबाबतची प्रक्रिया माहित नसल्याने त्यांना खूप वेळ रांगेत उभे राहावे लागते. तसेच हेलपाटे देखील मारावे लागतात. सुविधा ऑनलाईन असल्याने ऑफलाईन कडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. मात्र याबाबत महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे.
| एप्रिल पासून नागरिकांच्या तक्रारी कमी होणार
याबाबत महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांनी सांगितले कि खऱ्या गरीब लोकांना या योजनेचा फायदा मिळावा, यासाठी आम्ही प्रयासरत आहोत. त्यानुसार ऑनलाइन सुविधा करण्यात आली आहे. यातील तक्रारी कमी करण्यासाठी आम्ही एप्रिल पासून ही सुविधा ऑफलाईन देखील करतो आहोत. त्यासाठी अजून एक खिडकी सुरु केली जाणार असून त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार आहेत. जे नागरिक ऑनलाईन अर्ज करतील त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या झेरॉक्स आणि मूळ कागदपत्रे देखील घेऊन यायचे आहे. जेणेकरून आमचे कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करू शकतील. नागरिकांचा नाहक त्रास कमी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
| बनावट कागदपत्रे आढळल्यास गुन्हे दाखल केले जाणार
डॉ नाईक यांनी सांगितले कि ऑनलाईन सुविधेचा एक फायदा असा होतो आहे कि खऱ्या गरीब लोकांना याचा लाभ होताना दिसतो आहे. कारण काही बनावट कागदपत्र देऊन योजनेचा लाभ लुटत असत. यावर आळा घालता येणार आहे. कारण आम्ही आता उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्ड बनावट असेल तर ओळखू शकतो. तशी सुविधा आमच्याकडे आहे. त्यामुळे नागरिकांनी बनावट कागदपत्रे किंवा मोबाईल नंबर देऊ नयेत. असे आढळल्यास त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, असे आमचे नागरिकांना आवाहन आहे, असे ही डॉ नाईक म्हणाल्या.
——-