जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील ध्वनिप्रदूषण थांबवा
: मनसेची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पुणे : पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही योग्य ती कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे, अशी मागणी शहर मनसे कडून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना निवेदन देखील दिले आहे.
मनसेच्या शिष्टमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन
शहर मनसेच्या निवेदनानुसार राजसाहेब ठाकरे यांनी सातत्याने आवाज उठवत सर्वसामान्य जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या भोंग्या बाबत मनसे ची भूमिका मांडली आहे . या भूमिके नुसार व सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे.
तसेच सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये इत्यादी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
ध्वनिप्रदूषणाचा त्रास हा लोकांच्या आरोग्यालाही होतो. त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिल्यानंतरही पुणे पोलिसांकडून सक्त कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील ध्वनिप्रदूषणाला चाप लावण्यासाठी काय करणार, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे. या विषयी कृती आराखडाच आता उच्च न्यायालयाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे मागितला असल्याचे समजते. अशी वेळ पुणे पोलीसांवर येऊ नये पोलिसांच्या या कारवाई दिरंगाईबद्दल सर्वसामान्यांमध्येही नाराजी आहे.
ध्वनिप्रदूषणाचाअत्यंत गंभीर प्रश्न असून ध्वनिप्रदूषणाच्या बाबतीत पोलिसांकडून अजूनही अपेक्षेप्रमाणे कार्यवाही होताना दिसत नाही . फोनवरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कारवाई केली जातानाही पाहायला मिळत नाही. आता न्यायालयाच्या दट्ट्यानंतर तरी पोलिस या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कार्यवाही करावी अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. पुणे शहरातील अनेक धार्मिकस्थळांवर बेकायदेशी लाऊडस्पीकर लावण्यात आलेले आहेत त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नागरिकांनी फोन, व्हाट्सएप, मेल अथवा पत्र पाठवून कळविले तरी आपण गंभीर दखल घेऊन त्याबाबतीतही योग्य ती कार्यवाही करावी. तसेच ध्वनिप्रदूषणाच्या विषयी पुणे पोलिसांकडून जनजागृती अभियान कार्यक्रम हाती घेऊन पुणे शहरातील
ध्वनिप्रदूषण थांबवावे. असे मनसेच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS