Town planning shceme | वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

HomeBreaking Newsपुणे

Town planning shceme | वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

Ganesh Kumar Mule Jan 19, 2023 12:58 PM

Karve Road Parking Latest News | कर्वे रोडवरील वाहनाच्या पार्किंगबाबत वाहतूक पोलिसांकडून व्यवस्था 
Pune Airport Road | एअरपोर्ट रस्त्यावरून होणार विना अडथळा प्रवास | सम्राट अशोक चौक, येरवडा पोस्ट कार्यालय येथे सिग्नल कार्यान्वीत
PMC Employees Transfers | 8 उप अधीक्षक आणि 100 वरिष्ठ लिपिकांच्या होणार नियतकालिक बदल्या 

वडगावशेरीत होणार टीपी स्कीम! लवकरच इरादा जाहीर केला जाणार

| शहर सुधारणा समिती समोर प्रस्ताव

पुणे | पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दी मधील वडगावशेरी येथे नगर रचना परियोजना अर्थात टीपी स्कीम (Town  planning scheme) राबवली जाणार आहे.  या क्षेत्रासाठी प्रारूप नगर रचना योजनेचा मसुदा लवकरच प्रसिध्द केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून शहर सुधारणा समिती (City Improvement committee) समोर ठेवण्यात आला आहे.
समितीच्या प्रस्तावानुसार  वडगावशेरी हे गाव पुणे महानगरपालिकेमध्ये १९९७ साली समाविष्ट झाले. या गावांचा विकास आराखडा सन २००५ साली
प्रसिध्द झाला असून सन २००७ मध्ये टप्याटप्याने सदर डी.पी. मान्य झाला आहे. २००७ पासून आजतागायत वडगाव शेरी येथील स.नं. १७/१/३न, १०/४, ११/१/२/३ मधील डी.पी. रस्त्याखालील जागा पुणे मनपाच्या ताब्यात आलेल्या नाही. तसेच स्थानिक जागामालक रस्ते विकसित करणेकरीता विरोध होत असल्यामुळे वडगावशेरी गावाचा विकास झालेला नाही. तसेच रस्त्यांची कनेक्टीव्हीटी पुर्ण होत नसल्यामुळे विकसित रस्त्याचा वापर करणे शक्य होत नसून वाहतुक कोंडी होत आहे. तरी, सदर गावामधील रस्ते विकसित / ताब्यात येणाच्या दृष्टीने रोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सदर गावामध्ये स.नं. १७/१/३ब, १०/४, ११/१/२/३ येथे टि. पी. स्कीम राबविणे गरजेचे आहे. तरी वडगावशेरी गावातील स.नं. १७/१/३ब, १०/४, ११/१/२/३ या ठिकाणी रस्ते ताब्यात येण्यासाठी टि. पी. स्कीम राबविण्यास  माजी सभासद शीतल ज्ञानेश्वर शिंदे यांनी विनंती केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहर सुधारणा समितीची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला जाईल. (Pune Municipal corporation)