PMC : Hemant Rasne : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय!

HomeBreaking Newsपुणे

PMC : Hemant Rasne : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय!

Ganesh Kumar Mule Dec 15, 2021 7:16 AM

Smart city : PMC : पुणेकरांच्या खिशावर ‘स्मार्ट’ पणे डल्ला!  : सिग्नल साठी ५८ कोटी देणार  : पुणेकर कुणाला दाखवणार लाल सिग्नल? 
Hemant Rasane | गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याप्रती हेमंत रासने यांची कृतज्ञता | संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट
PMC Employees : Pension : मनपा निवृत्त कर्मचार्यांना मिळणार तातडीने पेन्शन

बेघरांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्पाला मंजुरी

पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान योजनेअंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बेघर नागरिकांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, सध्या येरवडा, सेनादत्त पेठ, बोपोडी, पुणे स्टेशन भागात बेघरांसाठी निवारा प्रकल्प राबविण्यात येतात. त्यांची मुदत संपल्याने नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट, ओबीसी सेवा संघ, जान्हवी फाउंडेशन, अक्षरसृष्टी ग्रंथालय या संस्थांची निवड करण्यात आली आहे.
रासने पुढे म्हणाले, या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. तो उपलब्ध झाला नाही तर दोन कोटी रुपयांची तरतूद असललेल्या युवक कल्याण निधी अंतर्गत हा खर्च केला जार्इल. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे एक बेघर निवारा केंद्र उभे करायचे आहे. त्यानुसार ३८ लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात ३८ निवारा केंद्र उभी करण्याची योजना आहे. जशी जागा उपलब्ध होर्इल त्यानुसार आगामी काळात ही केंद्र उभी केली जातील.
—-

अग्निशमन सेवा शुल्क मान्यता

अग्निशमन दलाकडून उंच इमारतींना तसेच विशेष वापराच्या विविध इमारतींना आग प्रतिबंधक उपाययोनांच्या दृष्टीने करावयाच्या यंत्रणेसाठी प्राथमिक आणि अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देताना अग्निशमन सेवा शुल्काच्या सुधारीत दरांना स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या विशेष वापराच्या विविध प्रकारच्या भोगवटा असणार्या ५०० चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळ असणार्या आणि ५०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्या इमारतींना अनुक्रमे २५ रुपये प्रती चौरस मीटर (किमान पंचवीस हजार रुपये) आणि ५० रुपये प्रती चौरस मीटर (किमान पन्नास हजार रुपये) शुल्क आकारले जाणार आहे. ही शुल्कवाढ आयुक्तांनी सुचविल्या प्रमाणे केली आहे.
रासने पुढे म्हणाले, १५ ते ४० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर १०० रुपये (किमान एक लाख रुपये), ४० ते ७० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर २५० रुपये (किमान अडीच लाख रुपये), ७० ते १०० मीटर उंचीच्या इमारतींसाठी प्रती चौरस मीटर ४०० रुपये (किमान चार लाख रुपये), १०० ते १५० मीटर उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ५०० रुपये (किमान साडे सात लाख रुपये) आणि १५० मीटर पेक्षा जास्त उंचीच्या इमारतीसाठी प्रती चौरस मीटर ६०० रुपये (किमान दहा लाख रुपये) शुल्क आकारण्यात येणार आहे. आयुक्तांनी सुचविलेल्या शुल्कात निम्म्याने कपात करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.
—–

शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी डीबीटी

महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वस्तू स्वरुपात मिळणार्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक (डीबीटी) खात्यावर जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते. या साहित्याचे किमान दरपत्रक ठरविण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणार्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
रासने म्हणाले, सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या स्थितीतशाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हते. या शैक्षणिक वर्षात अजूनही शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. परंतु नजिकच्या काळात शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास आवश्यकतेनुसार शालेय साहित्याचे वितरण करण्यासाठी डीबीटी पद्धतीने निधी जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारे शालेय साहित्याच्या किमान दरांना आज स्थायी समितीने मान्यता दिली.
—–

घसेटी पुलावरील मनपा शाळेत विविध अभ्यासक्रम

महात्मा फुले पेठेतील घसेटी पुलावरील महापालिकेच्या दगडी शाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिवसाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ही शाळा अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या परिसरात आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न असणारे, मागासवर्गीय आणि विडी कामगारांची संख्या मोठी आहे. या सर्व समाजघटकांना उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण, समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
रासने पुढे म्हणाले, पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षांसाठी शिवसाई फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाईल. आस्थापना, प्रशिक्षक, शिक्षक आदी खर्च फाउंडेशनच्या वतीने केला जाईल. पाणी, विद्युत व्यवस्था आदी सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील.
—-

भवानी पेठेत इंग्रजी माध्यमाची शाळा

भवानी पेठेत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत रेवकाई नॉलेज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, महापालिका क्षेत्रात इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनसारख्या संस्थांबरोबर करार करण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर रेवकाई नॉलेज फाउंडेशन या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे.
रासने पुढे म्हणाले, भवानी पेठेत अत्यल्प उत्पन्न असणार्र्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या मुलांना इंग्रजी शिकण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर आणि आस्थापना खर्च फाउंडेशन करणार आहे. विद्युत, पाणी आदी आवश्यक सेवा महापालिका पुरविणार आहे.
—–

शिवछत्रपती सन्मान विजेत्यांचा होणार गौरव

पुणे शहरातील राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या ६ खेळाडू आणि १३ क्रीडा मार्गदर्शकांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन महापालिकेच्या वतीने गौरव करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी  पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या पूर्वी महापालिका हद्दीतील  खेडाडू आणि मार्गदर्शकांचा गौरव करण्यास मान्यता देण्यात आली होती. १९ जणांनी नव्याने अर्ज केले होते. त्यांचा गौरव करण्यासाठी १२ लाख रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0