Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

HomeपुणेBreaking News

Pune congress | पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

Ganesh Kumar Mule Sep 19, 2022 2:34 AM

Kondhwa Road tender | कोंढवा रोड ची निविदा देखील वादाच्या भोवऱ्यात
PMC property Tax Department | टॅक्स विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वशिलेबाजीने 
Ghanshyam Nimhan | Pune congress | पुणे काँग्रेसच्या चिटणीसपदी घनश्याम निम्हण

पुणे काँग्रेसच्या सुकाणू समिती बैठकीत एकमताने हा झाला निर्णय

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यातही काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. शहर काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या बैठकीत स्वबळाचा नारा देत एकमताने तसा निर्णय घेण्यात आला. आघाडी करण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील आणि काँग्रेस संपूर्ण शहरात पोहोचण्यास मदत होईल, असा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसविरोधातही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याने महाविकास आघाडी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

शहर जिल्हा काँग्रेसच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातील रणनीतीसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत सर्व नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी केली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला.आघाडी करून निवडणुका लढविण्याने पक्षाचे नुकसान होईल, असे मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीत मदत होत नाही, अनेकदा काँग्रेसच्या विरोधातही काम केले जाते. त्यामुळे आघाडीचा फायदा काँग्रेसला होत नाही, अशी तक्रार या बैठकीत करण्यात आली. यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात नव्हते, तर बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाले होते, ही बाबही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली.निवडणुकीत उमेदवारी देताना काटेकोर विचार व्हावा, अशी सूचना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली. अनेक जण निवडणुकीतील उमेदवारीपुरते पक्षाकडे येतात. यामुळे पक्षाला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे अशांना उमेदवारी देण्यात येऊ नये, पाच वर्षे पक्षाच्या झेंड्याखाली नियमित कार्यक्रम घेणाऱ्यांचाच उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार व्हावा, यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत सर्व नेते मंडळीं व कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीनुसार निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या तसेच सर्व नेतेमंडळींच्या आग्रही मागणी नुसार येणारी पुणे महानगरपालिकेची निवडणुक काँग्रेस पक्ष स्वबळावर लाढणार आहे.  आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात प्रभागाची व पक्ष संघटनेची बांधणी करण्यास सुरूवात करावी असा निर्णय चर्चाअंती सर्वांच्या समंतीने घेण्यात आला.

अरविंद शिंदे, प्र. अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी