‘मै भी राहुल गांधी’ हा ट्रेन्ड काँग्रेस कार्यकर्त्यांनी चालवावा | डॉ. विश्वजीत कदम
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेल्या मोदी सरकारने सरकारी यंत्रणेचा गैर वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालविला आहे त्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र आंदोलन केले. महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. राजेश राठोड, आ. लहू कानडे, आ. जयंत आसगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन पार पडले.
यावेळी बोलताना डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, ‘‘केंद्रातील मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैर वापर करीत असून लोकशाही धोक्यात आणलीच आहे परंतु आराजकतेच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू झाली आहे. याला केवळ मोदी व शहा जबाबदार आहेत. केंद्र व राज्य यांचे अत्यंत चांगले असलेले संबंध गेल्या अडिच वर्षांपासून महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर मोदीजी फक्त सूडाचे राजकारण करीत असून ई.डी., सी.बी.आय. सारख्या संस्थाचा गैरवापर करीत आहेत्. काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर उतरून या सर्व गोष्टी जनतेपर्यंत मांडल्या पाहिजेत. काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी या सर्व गोष्टी संसदेमध्ये व बाहेर लोकांपुढे सतत मांडत आहेत म्हणूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. ची चौकशी लावून त्यांच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न हे मोदी शासीत केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे आजपासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वावरताना ‘मै भी राहुल गांधी’ असे लोकांपुढे जायला पाहिजे’’
आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ‘‘देशामध्ये मोदी व शहा हे लोकशाही धोक्यात आणत आहेत. सार्वजनिक संस्था विकल्यानंतर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ई. डी. चा वापर करून आपण केलेल्या चूका झाकण्याचे काम करीत आहे. राहुलजी गांधी हे या देशाचे भविष्य असून त्यांच्या सत्य बोलण्याने केंद्रातील मोदी सरकारचे पितळ उघडे पडत आहे. त्यामुळेच राहुलजी गांधी यांना टारगेट करून त्यांना ई. डी. मार्फत त्रास देण्याचे काम हे मोदी सरकार करीत आहे.’’
यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड आदींची भाषण झाली.
यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, पुजा आनंद, गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, चंदूशेठ कदम, राहुल शिरसाट, शिवा मंत्री, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, सचिन आडेकर, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, विजय खळदकर, प्रवीण करपे, विकास टिंगरे, साहिल केदारी, अमिर शेख, रमेश अय्यर, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, फिरोज शेख, प्रमोद निनारिया, संदिप मोकाटे, आबा जगताप, अनुसया गायकवाड, इंदिरा अहिरे, रजनी त्रिभुवन, स्वाती शिंदे, राधिका मखामले, राजश्री अडसुळ, शारदा वीर, राहुल तायडे, सुजित यादव, शाबीर खान, आयुब पठाण, चेतन आगरवाल, भरत सुराणा, मेहबुब नदाफ, अजित ढोकळे, अजित जाधव, भगवान कडू, नरसिंग आंदोनी, ऋषीकेश वीरकर, रामविलास माहेश्वरी, संगीता क्षीरसागर, नलिनी दोरगे, पपिता सोनावणे, बबलू कोळी, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे, प्रशांत सुरसे, बंडू नलावडे, सुमित डांगी, विश्वास दिघे आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.