बार्शीत सलग दहाव्या वर्षी जपली गेली शिव दीपोत्सवाची परंपरा
: जय शिवराय प्रतिष्ठानच्या कामाबाबत कौतुकाचा वर्षाव
बार्शी : दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर जय शिवराय प्रतिष्ठान कडून बार्शीत दरवर्षी शिव दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील ही परंपरा जपली गेली. प्रतिष्ठान कडून सलग दहाव्या वर्षी शिव दीपोत्सवाचे आयोजन केले गेले. यास भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठान कडून वर्षभर असे विभिन्न सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे प्रतिष्ठानच्या कामाबाबत कौतुकाचा वर्षाव केला गेला.
: विचारांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून घ्यायला हवा : अजिंक्य विद्यागर
या कार्यक्रमाला संघ लोकसेवा आयोग(U P S C) परीक्षा उत्तीर्ण अजिंक्य विद्यागर, पोलीस उपअधीक्षक (DYSP) परीक्षा उत्तीर्ण विशाल नागरगोजे, अन्न पुरवठा अधिकारी चांगदेव नागरगोजे, स्मार्ट अकॅडमीचे अध्यक्ष सचिन वायकुळे, मराठा सेवा संघाचे किरण गाढवे, पत्रकार संजय बारबोले, जिजाऊ ब्रिगेडच्या शैलजा गीते, छत्रपती ग्रुपचे अजय पाटील हे उपस्थित होते. नेहमीच बार्शीतील प्रशासन व्यवस्थेतील सनदी अधिकारी कार्यक्रमाला आमंत्रित करण्याची परंपरा ह्या वर्षी देखील संघटनेने कायम ठेवून सनदी अधिकारी कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. नवनिर्वाचित सनदी अधिकाऱ्यांकडून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अजिंक्य विद्यागर यांनी अनेक संकटावर मात करून यशा पर्यंत कसे पोहचावे या विचारांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला पाहिजे असं मत व्यक्त केले. तर विशाल नागरगोजे यांनी जातिभेद, धर्मभेद न मानता महापुरुषांची खरी विचारधारा समाजात रुजली पाहिजे, असे विचार व्यक्त केले.
यावेळी बोलताना सचिन वायकुळे, किरण गाढवे यांनी प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंतच्या कार्याचे कौतुक केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर छत्रपती शिवचरणी शेकडो दिवे व मशाली लावून परिसर प्रकाशमय करण्यात आला. यावेळी मूर्ती परिसर फुलांच्या सजावटीमुळे व दिव्यांच्या व मशालींच्या रोषणाई मुळे अतिशय मनमोहक असा दिसत होता. या कार्यक्रमाला विविध संघटनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी प्रतिष्ठित मंडळी, पत्रकार बांधव व मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित होते.
प्रास्ताविक व प्रतिष्ठानच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचं काम जय शिवराय प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य सुमित नाकटिळक,अमित नागोडे,आदित्य परबत, आकाश तावडे, बाबासाहेब बारकुल, नागराज सातव,विनित नागोडे, रोहित सातव, वैभव विधाते, अमोल वाणी, गणेश वाणी, सागर माने, राहुल वाडेकर, दिनेश घोलप, अजित पाटील, किरण नान्नजकर, अक्षय अंबुरे, मनोज मोरे, कृष्णा परबत, अविनाश वैद्य, दीप उपळकर, गुरू कोल्हाळे, हर्षल लाकुळे रविराज गायकवाड राहुल अनभुले यांनी परिश्रम घेलते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गुंड यांनी तर संकेत वाणी यांनी आभार मानले.
COMMENTS