पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली
: शिवाजीनगर, पाषाण ला सर्वात कमी तापमानाची नोंद
पुणे : महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. पुण्यातही गेल्या आठवड्यापासून बोचऱ्या थंडीची लाट आली आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून पुण्याचे तापमान 10 अंश सेल्सियस च्या खाली आले आहे. आज म्हणजे 27 जानेवारीला पाषाण 8.9, शिवाजीनगर 9.8, NDA 9.4 अशा तापमानाची नोंद झाली आहे.
: आगामी 24 तासांत अजून महाराष्ट्र गारठणार
पुण्याचे तापमान गोठत असताना महाराष्ट्रातही हीच स्थिती दिसून येते आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत थंडी अजून वाढणार आहे. याबाबत नागरिकांना दक्ष राहावे लागणार आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढणार आहे. इकडे पुणे जिल्हा देखील चांगलाच गारठून गेला आहे. हवामान विभागाचे संशोधक के एस होसाळीकर यांनी शहर आणि जिल्ह्यातील तापमान कसे कमी झाले ते सांगितले आहे.
: असे आहे तापमान
शिवाजीनगर : 9.8
पाषाण : 8.9
NDA : 9.4
हवेली : 9.1
माळीण : 9
COMMENTS