Bonus : मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थायी समितीची देखील मान्यता

HomeपुणेPMC

Bonus : मनपा कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थायी समितीची देखील मान्यता

Ganesh Kumar Mule Oct 12, 2021 11:40 AM

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा पाऊस!  | शेवटच्या दिवशी जवळपास सव्वा तीन हजार हरकती 
Devlopment works : Murlidhar Mohol : समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य : महापौर मोहोळ
Aarogya Aadalat | महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या समस्या निवारणासाठी “आरोग्य अदालत”

कर्मचाऱ्यांच्या बोनसला स्थायी समितीची देखील मंजुरी

: 5 वर्षाचा होणार करार

पुणे: पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. सद्य स्थितीत 5 वर्षाचा करार संपलेला आहे. त्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२०- २१ ते २०२४-२५ या ५ आर्थिक वर्षाकरीता सानुग्रह अनुदान अधिक जादा रक्कम आदा करणेबाबत संघटनेने  मागणी केलेली होती. त्यानुसार मागील बुधवारच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला.त्यानंतर मंगळवारच्या स्थायी समितीत देखील हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय  बैठकीत झाला. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
: स्थायी समितीत झाली चर्चा
पुणे महानगरपलिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) तसेच माध्यमिक व तात्रिक
शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना (शिक्षण सेवकांसह) आणि पुणे महानगरपालिका शिक्षण
मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना (बालवाडी शिक्षिका व सेवकांसह) तसेच महानगरपालिकेच्या
कामास नेमण्यात आलेल्या कंत्राटी व एकवट वेतनावर काम करणाऱ्या सेवकांना, ज्यांचे वेतन महानगरपालिका
निधीतुन अदा करण्यात येते त्या सर्वांना सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षातील सुधारित वेतन संरचनामधील मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता या एकुण रकमेच्या ८.३३ टक्के अधिक जादा रकम प्रत्येक वर्षी अनुक्रमे १७,०००, १९,०००, २१,०००, २३,०००, २५,००० इतकी एकुण रकम सानुग्रह अनुदानापोटी दिवाळीपुर्वी दोन आठवडे मान्यताप्राप्त युनियन बरोबर करार करून देण्यात यावी. अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार याबाबत मागील बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली होती. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय बैठकीत झाला होता. या प्रस्तावावर आता स्थायी समितीने देखील मुहर लावली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0