HSC Results | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

HomeपुणेBreaking News

HSC Results | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Ganesh Kumar Mule Jun 07, 2022 9:02 AM

Weather update : राज्यातील तापमानाचा पारा वाढला!
Natural Calamities | नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PMU Meeting Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता, उद्या म्हणजे बुधवार दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे.