MLA Sunil Kamble’s work report : Chandrakant Patil : आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला

HomeBreaking Newsपुणे

MLA Sunil Kamble’s work report : Chandrakant Patil : आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला

Ganesh Kumar Mule Feb 27, 2022 11:39 AM

By-election |  कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार
Bihar Political Crisis | नितीश कुमार यांचा राजीनामा | राजदसोबत सरकार स्थापन करणार
Amazing Posters in Pune | राज्य सरकारच्या कारभारावर टीका करणारे पोस्टर्स | पुण्यातील पोस्टर्स ने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

आमदार सुनील कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ हा मजबूत बालेकिल्ला

: पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये या महानगरपालिका निवडणुकीत चमत्कार घडेल – चंद्रकांत  पाटील

पुणे : “भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ (Pune cantonment constituency) हा मजबूत बालेकिल्ला आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांच्या नेतृत्वाखाली बनतो आहे,.  येत्या महानगरपालिका निवडणुकीत (PMC election) या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शंभर टक्के यश मिळवेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज व्यक्त केला.

आमदार सुनील कांबळे यांच्या कार्य अहवालाचे उद्घाटन व भारतीय जनता पार्टीचे कॅन्टोन्मेंट मतदार संघातील बुथ केंद्र प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांचा निवडणूक पूर्वतयारीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात  पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुनील कांबळे, शहर उपाध्यक्ष डॉक्टर श्रीपाद ढेकणे, मंडल अध्यक्ष महेश मुंडे, कुलदीप साळवेकर नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पन्नास वर्षात पुण्याच्या विकासासाठी केलेल्या कामांची चर्चा व भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची चर्चा खुलेपणाने करण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्यात भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहिली. त्याच प्रमाणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला बनला आहे. हा बालेकिल्ला बनवण्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे, असा विश्वास त्यांनी दिला.

आज झालेल्या कोरेगाव पार्क येथील मेळाव्यात  पाटील उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सुरुवातीला आयोजन करण्यात आले होते. या मन की बात कार्यक्रमाचा कार्यकर्त्यांच्या समवेत दादांनीही लाभ घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना याची माहिती देणारे प्रदर्शनी कार्यकर्त्यांसाठी लावण्यात आली होती.

यावेळी बोलताना पुणे शहर उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉक्टर श्रीपाद ढेकणे यांनी बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख हीच पार्टीची खरी संपत्ती आहे आणि यात संपत्तीच्या आधारावर भारतीय जनता पार्टी पुण्याचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास व्यक्त केला.

येत्या निवडणुकीत कमळ कॅन्टोन्मेंट मध्ये फुलवू  : आमदार सुनील कांबळे

माझा कार्य अहवाल हा भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला साजेसा व सामान्य माणसाला केंद्रित ठेवून केलेल्या कामाचा लेखाजोखा आहे, असे मनोगत यावेळी आमदार सुनील कांबळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी ही जगातली एकमेव व्यक्तीच्या नाहीतर कार्यकर्त्यांच्या आधारे ओळखली जाणारी पार्टी आहे आणि तिला बळकट करण्याची जबाबदारी ही आपणास सर्व कार्यकर्त्यांची आहे. येत्या निवडणुकीत सामान्य माणसाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीचे कमळ कॅन्टोन्मेंट मध्ये फुलवू या, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाची कन्टोनमेंट मतदार संघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आगामी काळात कॅन्टोन्मेंट मतदारसंघांमध्ये होणाऱ्या महिला मेळावा, युवक मेळावा व विविध कार्यक्रमांची माहिती या वेळी देण्यात आली.

मंडल अध्यक्ष महेश पुंडे यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक उमेश गायकवाड, लताताई धायरकर, मंगलाताई मंत्री, अर्चना पाटील, मनीषा लडकत, कालिंदाताई पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर जेष्ठ पदाधिकारी पोपटराव गायकवाड, पिल्ले आण्णा यावेळी उपस्थित होते

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0