डॉक्टरांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार : मनपा आयुक्त्त विक्रमकुमार
पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि पुणे शहर डॉक्टर सेल तर्फे मागील आठवड्यात डॉक्टरांचा मेळावा घेण्यात आला. त्यात काही प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. त्या अनुषन्गाने शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे आणि डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संभाजी करांडे यांच्या पुढाकारातून पुणे मनपा आयुक्त आणि डॉक्टर सेल पदाधिकारी यांच्यात मीटिंग पार पडली.
यामध्ये प्रामुख्याने नव्याने समाविष्ट 23गावातील नवीन हॉस्पिटल रजिस्ट्रेशन त्यातील अडचणी ,परवाना नूतनीकरण आकारण्यात येणाऱ्या अवास्तव चार्जेस ,छोट्या क्लिनिक बायोमेडिकल वेस्ट संकलनात येणाऱ्या अडचणी याची संख्या 10000च्या घरात असताना त्याच्या संकलनात सुसूत्रता नाही .अश्या अनेक अडचणींना रोज सामोरं जावं लागत आहे म्हणून डॉक्टर सेल माध्यमातून डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी त्यावर तातडीने बांधकाम खात्यातील अधिकारी ,पास्को अधिकारी यांचेबरोबर मीटिंग घेऊन तात्काळ उपाययोजना योजून मार्ग काढू. अशी ग्वाही पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांनी आज डॉक्टर सेल शिष्टमंडळ याना दिली.
याप्रसंगी शहराध्यक्ष मा अरविंद शिंदे मा रमेशदादा बागवे नगरसेवक अविनाश बागवे डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ संभाजी कारंडे, मा .अध्यक्ष डॉ रवींद्रकुमार काटकर ,सेक्रेटरी डॉ अनिकेत गायकवाड उपाध्यक्ष डॉ अण्णासाहेब गरड डॉ भरत कदम डॉ ऋषिकेश नाईक इ डॉक्टर सेल पदाधिकारी उपस्थित होते.