Maharashtra Kesari | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

HomeपुणेBreaking News

Maharashtra Kesari | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच! |  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Ganesh Kumar Mule Dec 09, 2022 2:10 PM

Aashadhi Ekadashi 2023 | नगरचे काळे दांपत्य आषाढी एकादशी निमित्त पूजेचे मानाचे वारकरी | कसे निवडले जातात मानाचे वारकरी?
Special session | महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन २ व ३ जुलै रोजी | पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक
Nana patole | congress | अदानी समुहात केलेली गुंतवणूक धोक्यात आली असून जनतेचा पैसा बुडण्याची भिती | नाना पटोले

‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!

|  भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची असणाऱ्या ६५ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान संस्कृती प्रतिष्ठानला (sanskriti pratisthan) मिळाला आहे. या संदर्भात कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला दिल्याचे पत्र भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. ब्रिजभूषण सिंह (MP Brijbhushan singh) यांच्याकडून स्वीकारल्याची माहिती संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली. स्पर्धेच्या तारखा आणि ठिकाण लवकरात लवकर कळवण्याच्या सूचना या पत्रात कुस्ती महासंघाने दिल्या आहेत.  Maharashtra Kesari

नवी दिल्ली येथे बृजभूषण सिंह यांनी यांनी मोहोळ यांना हे पत्र दिले. यावेळी राज्य कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके समवेत होते. दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांना या स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले असून, ते त्यांनी स्वीकारले असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्र केसरी’ अधिकृतपणे कोण भरवणार याबाबत संभ्रम होता. मात्र, कुस्ती महासंघाने संस्कृती प्रतिष्ठानच्या आयोजनावर शिक्कामोर्तब केल्याने हा संभ्रम दूर झाला असून, महासंघाच्या अस्थायी समितीचे पदाधिकारी यासंदर्भातील कार्यभार पाहत आहेत.

“महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे संस्थापक आणि ‘महाराष्ट्र केसरी’चे जनक स्व. मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडे ‘महाराष्ट्र केसरी’चे आयोजन येणे, ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. प्रत्येकाच्या आठवणीत राहील आणि कुस्तीला आणखी उंचीवर नेता येईल, अशा प्रकारचे आयोजन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल. लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला जाईल,” असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ब्रिजभूषण सिंह म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा लाभलेली आहे. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवली जावी. या स्पर्धेसाठी आपण स्वतः उपस्थित राहणार आहोत. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले. त्यातून अनेक कुस्तीगीर घडले. तालीम संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. तेव्हा ही स्पर्धा चांगल्या स्वरूपात पार पडेल.”