Winter session | PMC | प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार 

HomeBreaking Newsपुणे

Winter session | PMC | प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार 

Ganesh Kumar Mule Dec 10, 2022 10:44 AM

Pashan-sus Road | पाषाण -सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा | नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांचा वानवडी भागात पदयात्रेद्वारा मतदारांशी संवाद
Women Self Help Group | Hari Sawant | हडपसर परिसरात गोरगरीब महिलांचे बचत गट | भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचा पुढाकार 

प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती आणि मुख्य सभेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार

| खूप लोकांनी केल्या आहेत तक्रारी

पुणे | महापालिकेची निवडणूक (PMC election) मुदतीत होऊ न शकल्याने महापालिकेवर प्रशासक (administrator) नेमण्यात आले आहेत. त्यांच्या नेतृत्वात कामकाज होत आहे. मात्र या कामकाजाबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. खास करून प्रशासकांनी घेतलेल्या स्थायी समिती (standing committee) आणि मुख्य सभेबाबत (General body) या तक्रारी आहेत. हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजू शकतो. कारण याबाबत भाजपचे कॅंटोन्मेंट चे आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांनी माहिती मागितली आहे.

| आमदार सुनील कांबळे यांनी महापालिकेला दिले पत्र

आमदार कांबळे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेच्या कामकाजाच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी नागरिकांनी माझ्याकडे केलेल्या आहेत. सदरच्या तक्रारी या हिवाळी अधिवेशनात मांडण्यासाठी मला खालील बाबींची माहिती मिळणे आवश्यक आहे. तरी सदरची माहिती मला तातडीने देण्यात यावी.

1. पुणे महानगरपालिकेवर प्रशासक नेमणूक झाल्यापासून आजतागायत एकूण किती मुख्यसभा व
स्थायी समिती सभा झालेल्या आहेत ?
2. सदर झालेल्या मुख्यसभा आणि स्थायी सभांमध्ये एकूण किती विषय दाखल करण्यात आले ?
व त्यापैकी किती विषयांना मान्यता मिळलेली आहे ?
3. तसेच पुणे मनपामध्ये प्रशासकाची नेमणूक झाल्यापासून आजतागायत स्थायीसमितीमध्ये किती
निविदा मान्य करण्यात आल्या आहेत ? व सदर निविदांमध्ये सहभागी झालेले किती कंत्राटदार पात्र व
अपात्र झालेले आहेत ? (यांची सविस्तर यादी देण्यात यावी )
4. 24×7 कामाची निविदा मान्य झाल्यापासून आजतागायत किती काम झाले आहे ? (याची
सविस्तर विभाग निहाय माहिती द्यावी)
5. जायका (नदी सुधार) प्रकल्पाचे निविदा मान्य झाल्यापासून आजतागायत किती काम झाले
आहे ? ( याची सविस्तर विभाग निहाय माहिती द्यावी)