शहरातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री 12 डिसेंबर ला घेणार बैठक
| महापालिका आणि पाटबंधारेचे अधिकारी राहणार उपस्थित
पुणे | शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठ्या (Water Distribution) बाबतच्या तक्रारी वाढत आहेत. याबाबत पालकमंत्र्यानी नुकतीच बैठक घेतली होती. मात्र यात पाटबंधारे (Irrigation) आणि महापालिका (PMC Pune) अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर पाटबंधारे आणि महापालिका यांच्यात देखील बैठक पार पडली. याच अनुषंगाने आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) 12 डिसेंबर ला बैठक घेणार आहेत. त्यासाठी पाटबंधारे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहतील. (Pune municipal corporation)
शहरात समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण न झाल्याने वितरण व्यवस्थेत बऱ्याच अडचणी येत आहेत. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नाकरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. पालकमंत्र्यांनी 12 डिसेंबर ला याबाबत बैठक बोलावली आहे. याआधी देखील पालकमंत्र्यांनी पाटबंधारे आणि पाणीपुरवठा विभागासोबत बैठक घेतली होती. मात्र यात महापालिका आणि पाटबंधारे अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली होती. (Irrigation dept pune)
यावर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे विभागासोबत बुधवारी महापालिकेत बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पाटबंधारे ने जी चुकीची बिले किंवा ज्यादा दर लावले आहेत. ते दुरुस्त करून देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली. त्यानुसार पाटबंधारे विभाग माहिती सादर करणार आहे.