Talathi Bharti 2023 | तलाठी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या

HomeBreaking Newsपुणे

Talathi Bharti 2023 | तलाठी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Jun 22, 2023 2:35 AM

Must give polio vaccine to your baby on 3rd March   : Appeal by  Health Minister Prof.  Dr. Tanaji Sawant
Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे धरणे आंदोलन
Weather update : राज्यातील तापमानाचा पारा वाढला!

Talathi Bharti 2023 | तलाठी भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घ्या

| जमाबंदी आयुक्तालय येथे ‘तलाठी भरती कक्ष’ सुरू

Talathi Bharti 2023 | महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या  सरळसेवा भरतीच्या (Talathi Bharti) अनुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला, पुणे या ठिकाणी ‘तलाठी भरती कक्ष’ (Talathi Bharti Kaksh) सुरु करण्यात आलेला आहे. (Talathi Bharti 2023)
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४ हजार ६४४ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) कार्यालयाकडून राज्यातील एकूण ३६ जिल्हाच्या केंद्रावर ऑनलाइन (कंप्युटर बेस्ड टेस्ट) परीक्षा घेण्यात येणार आहे. (Talathi Bharti Exam)
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने राज्यातील तलाठी पदभरती राबविण्यासाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख पुणे यांची नेमणूक केली आहे. त्याअनुषंगाने कार्यालयाच्यावतीने ‘तलाठी भरती कक्ष’ सुरु करण्यात आलेला आहे.
या कक्षामध्ये पद भरती प्रक्रिया राबविण्याकरीता सामान्य प्रशासन विभागाच्या ४ मे २०२२ आणि  २१ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयामधील तरतूदी व मार्गदर्शक सूचनानुसार नमूद कंपन्यांची व्यवहार्यता तपासून कंपनीची निवड करणे, एजन्सीने निवडलेले परीक्षा केंद्र क्षेत्रीय यंत्रणेमार्फत तपासणे, पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करुन निवड केलेल्या कंपनीसोबत पदभरती प्रक्रियेसंबंधित सामंजस्य करार करणे, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेचे आयोजन, परीक्षेचा निकाल, शिफारस झालेल्या व शिफारस न झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, पदभरतीसंबंधीत उमेदवारांकडून आक्षेप व तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यासंबंधित कंपनीशी पत्रव्यवहार करुन अडचणींचे निराकरण करणे आदी प्रकारची कामे होणार आहे.
सदर तलाठी भरतीसाठी सामान्य नागरिकांसाठी व प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे राज्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमि अभिलेख आनंद रायते यांनी कळविले आहे.
0000
News Title | Talathi Bharti 2023 |  Know Talathi Recruitment Detailed Information
 |  ‘Talathi recruitment room’ is running in Jamabandi district